कोरोनापेक्षाही भयानक :  100 वर्षांपूर्वी हजारो अमरावतीकर होते क्वारंटाइन 

अमरावती ः 1920 साली शहराबाहेर प्लेगग्रस्तांसाठी उभारण्यात आलेले क्वारंटाइन सेंटर.
अमरावती ः 1920 साली शहराबाहेर प्लेगग्रस्तांसाठी उभारण्यात आलेले क्वारंटाइन सेंटर.
Updated on

अमरावती :  रिकामी होणारी गावे, जिथे पहावे तिकडे मृत्यू आणि भयाची काळरात्र, सर्वत्र सन्नाटा आणि मरणाची भीती, असे भयावह चित्र तब्बल 100 वर्षांपूर्वी निर्माण झाले होते. गावेच्या गावे गिळणाऱ्या प्लेगच्या साथीदरम्यान प्लेगग्रस्त हजारो अमरावतीकरांना सुद्धा गावाबाहेर क्वारंटाइन करण्यात आले होते. या साथीमध्ये कितीजणांनी प्राण गमाविले, किती कुटुंबे उद्वस्त झालीत याची काहीच मोजदाद नाही. 

प्लेगच्या आजाराने लाखो लोकांना  केले गिळंकृत

सध्या जगभर कोरोनाचा हाहाःकार सुरू असला तरी तब्बल 100 वर्षापूर्वी प्लेगच्या आजाराने लाखो लोकांना गिळंकृत केले होते. त्याचवेळी हजारो प्लेगग्रस्त अमरावतीकरांना शहराबाहेर तयार करण्यात आलेल्या झोपडयांमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. सध्या कोरोनाचीच सर्वत्र चर्चा होत असून विलगीकरण (क्वारंटाइन) हा शब्द दररोज कितीतरी वेळा आपल्या कानावर पडतो. संस्थात्मक विलगीकरण तसेच गृहविलगीकरण असे त्याचे उपप्रकारसुद्धा आहेत. कोरोनाच्या निमित्ताने क्वारंटाइन तसेच क्वारंटाइन सेंटर्सची चर्चा होत असली तरी ही प्रक्रिया आताच आलेली नाही.

1920 मध्ये प्लेगची साथ

सन 1920 मध्ये प्लेगची साथ मोठ्या प्रमाणावर आल्यानंतर तत्कालीन ब्रिटिश सरकारकडून प्लेग झालेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत होते. त्यासाठी अमरावती शहराबाहेर झोपड्या तयार करण्यात आल्या होत्या. याची नोंद अमरावतीचा इतिहास या पुस्तकात सापडते. याच पुस्तकात त्या काळच्या शहराबाहेरील क्वारंटाइन सेंटरचे छायाचित्र सुद्धा देण्यात आले आहे. त्यावेळी हजारो लोक प्लेगच्या साथीला बळी पडले होते, मात्र त्यांचा निश्‍चित आकडा उपलब्ध नाही. त्यावेळी ब्रिटिश अधिकारी सॅंडर्स हे प्लेग कमिश्‍नर म्हणून काम पाहत होते. प्लेगमुळे गावेच्या गावे खालसा होत होती, त्यावेळी ब्रिटिश सरकारला इंग्लंडवरून वैद्यकीय तज्ञांकडून विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 
 

विदेशातून आली साथ 

100 वर्षांपूर्वी परदेशातून प्लेगच्या साथीचा उगम झाला होता. त्याचा लोण भारतभर पसरले, सध्याची अमरावती म्हणजेच त्यावेळच्या उमरावतीमध्ये सुद्धा प्लेगने हातपाय पसरविले होते. 1920 मध्ये उद्भवलेली ही साथ पुढे अनेक वर्षे कायम राहिली, अशीही नोंद आहे. आताचा कोरोना सुद्धा विदेशातूनच आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com