उमरेडची पिकोसा ठरली "याॅडलिंग क्वीन'

उमरेडची पिकोसा ठरली "याॅडलिंग क्वीन'

उमरेड - शहरातील स्व. देवरावजी इटनकर पब्लिक स्कूलमध्ये शिकणारीअवघ्या बारा वर्षांची पिकोसा विनोद मोहरकर एका वाहिनीच्या "शो'मध्ये गायनाच्या स्पर्धेत स्पर्धक म्हणून नावारूपास येत आहे. तिला सगळे "याॅडलिंग क्वीन पिकोसा' या नावाने ओळखतात. अशी ही पिकोसा आता तमाम उमरेडकरांची शान झाली आहे.

दोन वर्षांची असतानाच तिला गायनाची आवड जडली. स्वयंप्रेरणेतून गायनकला शिकली. नंतर तिच्या कलागुणांना वाव मिळावा, या दृष्टीने तिला गायनाचे शिक्षण देण्यात आले, असे तिचे वडील विनोद मोहरकर यांनी सांगितले.

मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, पंजाबी, बंगाली, तमिळ, स्पॅनिश, फ्रेंच अशा अनेक भाषांमध्ये ती अगदी सहजरीत्या गाते. मागील 2 महिन्यांपासून ती एका वाहिनीच्या स्टुडिओमध्ये असल्याचेही तिच्या वडिलांनी सांगितले. तिच्यासोबत तिची आई अलका मोहरकर यादेखील आहेत.

सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांच्या आवाजातील "चला जाता हूं ,किसीं की धून मे ! धडकते दिल के तराने लिये !' यासारखे अवघड गीत "याॅडलिंग' सहज आणि उत्कृष्टरित्या गाते. तिचा हा नववा टीव्हीशो असून तमाम उमरेडकरांसाठी अभिमानाची व गर्वाची बाब आहे. उमरेडसारख्या लहान गावातील मुलगी मायानगरीत मोठ्या व्यासपीठावर गाणे गाऊन तिने उमरेड ही सांस्कृतिक नगरी आहे, हे सिद्ध करून दाखविले.

माझी मुलगी ही विदर्भातील एकमेव मुलगी आहे, जी अनेक भाषेत गाणी गाते. तिचे 9 टीव्हीशो झाले. त्यात ती उमरेडचे प्रतिनिधित्व करते. आज मुलींमुळे देशभरात ओळख निर्माण झाली की पिकोसाचे वडील म्हणून तिचा अभिमान वाटतो. मी जनतेला एकच संदेश देईल की "मुलगी वाचवा, देश वाचवा'

पिकोसा ही आमच्या शाळेत सहाव्या वर्गात शिकते. गायनाची तिला फार आवड असून उत्कृष्ट गायन कौशल्यासोबतच ती उत्तम नृत्यसुद्धा करते. हे सारे सांभाळून अभ्यासात विशेष लक्ष देते , अभ्यासात हुशार मुलगी आहे. आमच्या शाळेची ती आदर्श विद्यार्थिनी आहे. भविष्यातील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा .
- योगिता सूरज इटनकर, संचालिका, स्व.देवराव इटनकर पब्लिक स्कूल, उमरेड

पिकोसामुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यात उमरेड शहराचे सांस्कृतिक क्षेत्रात नाव उंचावले आहे .
- संजय गायकवाड, नाट्य दिग्दर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com