esakal | कामगारांचा हातभार अन्‌ सुताचे कंटेनरर्स समुद्रापार!

बोलून बातमी शोधा

cotton
कामगारांचा हातभार अन्‌ सुताचे कंटेनरर्स समुद्रापार!
sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

यवतमाळ : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक सूतगिरणीची चाके ठप्प झाली. मात्र, 'अनलॉक' होताच सूत उत्पादनात गिरणीने भरारी घेतली असून, गुणवत्तापूर्ण सुताची चीन व हॉंगकॉंग देशात निर्यात होत आहे. सहा महिन्यात ३१ सूताचे कंटेनरर्स अर्थात ३०० मेट्रिक टन सुताची निर्यात करण्यात आली. कोरोना काळात कामगारांचे सूतगिरणीने दायित्व जोपासल्याने कामगारांच्या सहकार्यातून केवळ हे शक्‍य झाले.

हेही वाचा: वाघिणीची शिकार करणाऱ्या दोघांच्या मुकुटबन पोलिसांनी आवळल्या मुसक्या; दोन फरार

सुधाकर नाईक यांची दूरदृष्टी -

पुसद व महागाव तालुक्‍यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ व्हावा या दृष्टीने माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुढाकाराने पिंपळगाव कान्हा येथे तीन दशकांपूर्वी बाबासाहेब नाईक सूतगिरणीची स्थापना झाली. माजी मंत्री मनोहर नाईक, माजी मंत्री डॉ. एन.पी हिराणी व सहकारी यांच्या प्रयत्नातून गिरणीला उभारी मिळाली. दोन वर्षांपूर्वी धडाडीचे सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते राजेश आसेगावकर यांनी सूतगिरणीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला.

४७५ कामगार -

मागील उन्हाळ्यात कडक लाकडाऊन असताना दोन महिन्यांचा निम्मे पगार गिरणी व्यवस्थापनाने सहृदयतेने केला. या गिरणीत एकूण ४७५ अधिकारी, कर्मचारी,कामगार आहेत. त्यापैकी ३५० कामगार असून कोरोना काळात कुणालाही कमी करण्यात आले नाही. सूतगिरणीतील 'टीएफओ' या अद्ययावत यंत्रावर तयार करण्यात आलेल्या १६ काऊंटच्या दर्जेदार सुतास मंदीच्या काळातही मोठी मागणी आहे.

हेही वाचा: दहा वर्षांपासून अंथरुणावर, निरनिराळे संसर्ग; पण घरातच उपचार घेत केली कोरोनावर मात

सूत निर्यातीला प्राधान्य -

एकूण ३० कंटेनरद्वारा सुताचा पुरवठा चीन व हॉंगकॉंग या देशाना करण्यात आला. ज्यादा भाव मिळत असल्याने गिरणीने सूत निर्यातीला प्राधान्य दिले व कोरोना काळातही गिरणीने एक पाऊल पुढे टाकले. संस्थेचे मार्गदर्शक माजी मंत्री मनोहर नाईक, गिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक एम. आय. पाथरी, कामगार संघटनेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे लॉकडाऊन नंतर तीन पाळ्यात पूर्ण क्षमतेने सूत उत्पादन सुरू आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या सहभागातून ८९ टक्‍के उत्पादन क्षमतेचा वापर होत आहे.

कामगारांना नऊ टक्‍के एवढे वाढीव बोनस -

दिवाळी बोनस म्हणून कामगारांना नऊ टक्‍के एवढे वाढीव बोनस देण्यात आला. एकीकडे सूतगिरण्या बंद पडत असताना विदर्भातील बाबासाहेब नाईक सूतगिरणीने पूर्ण कार्यक्षमतेने विदर्भ दुसरा क्रमांक मिळविला आहे. माजी मंत्री मनोहर नाईक, नगराध्यक्ष अनिता नाईक, उपाध्यक्ष ययाती नाईक, आमदार इंद्रनील नाईक व नाईक परिवाराने सोपवलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा निर्धार अध्यक्ष राजेश आसेगावकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: धक्कादायक! नागपुरात महिनाभरात तब्बल २२८२ कोरोनाबळी; ग्रामीण भागातही रुग्णसंख्या अधिक

केवळ सूतनिर्मितीवर निर्भर न राहता पूरक उत्पादनांवर सूतगिरणीचा भर राहणार आहे. यासाठी यवतमाळ जिल्हा सूत व कापड गिरणी पुसद येथे नाईक सूतगिरणीच्या युनिट-२ चा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर दोन बैठकी झाल्या असून, उच्च तंत्रज्ञानावर आधारित जपान मशीन द्वारे टी-शर्ट, लॅक्रान, हॅन्ड ग्लोज, मास्क निर्मिती करण्यात येईल. याद्वारे चारशे कामगारांना रोजगार मिळेल.
- ययाती नाईक, उपाध्यक्ष, बाबासाहेब नाईक सूतगिरणी
सूतगिरणीच्या दर्जेदार सुताला मिळालेली ही पावती आहे. सूतगिरणीने नेहमीच कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कामगार सूत उत्पादनासाठी नेहमीच पुढे असतात. सूतगिरणीच्या संचालक मंडळ, कामगार, कर्मचारी यांच्या साहचार्याने कोरोना काळावर मात करता आली.
- राजेश आसेगावकर ,अध्यक्ष, बाबासाहेब नाईक सूतगिरणी