नागपूरच्या यश गुल्हाणेला सुवर्णपदक

नागपूरच्या यश गुल्हाणेला सुवर्णपदक

नागपूर -  अंबाझरी येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या जलतरण तलावावर सुरू असलेल्या राज्य शालेय जलतरण स्पर्धेत दुसऱ्या दिवशी नागपूर विभागाच्या जलतरणपटूंनी दोन सुवर्णांसह एकूण सात पदकांची कमाई केली. 

यश गुल्हाणे आणि स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या रिले संघाने सुवर्णपदके जिंकली, तर मनस्विनी मोहिते व रिषिका बोदेलेने रौप्यपदकांची कमाई केली. आर्यन जैस्वाल, पुजेश डफले व सेंटर पॉइंटच्या रिले संघाने ब्राँझपदक पटकाविले. यशने १७ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये एक मिनिट १४.६६ सेकंद इतकी वेळ नोंदवित सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. १७ वर्षांखालील मुलींच्या ४ बाय १०० मीटर मेडले रिलेमध्ये संजना खुशवाह, प्रियांशू सोरते, चारुश्री जिचकार व नीमा घाटे यांचा समावेश असलेल्या स्कुल ऑफ स्कॉलर्सने सुवर्णपदक पटकाविले. मनस्विनीने १९ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये, तर रिषिकाने याच वयोगटात १०० मीटर ब्रेस्ट्रस्टोकमध्ये रौप्यपदक जिंकले. दुसऱ्याही दिवशी मुंबई, पुणे आणि क्रीडा प्रबोधिनीच्या जलतरणपटूंचाच दबदबा राहिला.

निकाल (प्रथम तीन विजेते)- १४ वर्षांखालील गट - १०० मीटर बॅकस्ट्रोक (मुले) : मोईज महंमद चौधरी, मुंबई (१:११:९७ सेकंद), रुद्र इंगळे(पुणे), तनय मुळीक(मुंबई). (मुली) : अस्मी देसाई, कोल्हापूर(१:१६:४४ सेकंद), भक्‍ती वाडकर(कोल्हापूर), श्‍वेता कुराडे(क्रीडा प्रबोधिनी). १०० मीटर फ्रीस्टाइल(मुले) : अरुण बढे, पुणे(१:०६:६९ सेकंद), मानव गुप्ता(मुंबई), आर्यन जैस्वाल(नागपूर). १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक(मुले) : अंशुमन जिंगरान, मुंबई(१:१६:२८ सेकंद), बालाजी पाटील(कोल्हापूर), एल. श्रेष्ठ(मुंबई). (मुली) : झारा जब्बार, मुंबई(१:२४:१२ सेकंद), भक्‍ती काळमेघ(अमरावती), अनुष्का पाटील(कोल्हापूर). 

१७ वर्षांखालील गट- १०० मीटर बॅकस्ट्रोक (मुले) : वेदांत बाफना, मुंबई (१:०१:५९ सेकंद), गौरव चव्हाण(क्रीडा प्रबोधिनी), कपिल शेट्‌टी(मुंबई). (मुली) : निष्ठा अग्रवाल, पुणे (१:१५:०० सेकंद), आर्या कृपलानी(मुंबई), रुचिता कदम(क्रीडा प्रबोधिनी). १०० मीटर फ्रीस्टाइल(मुले) : सुचित पाटील, मुंबई(५५.७२ सेकंद), अथर्व पै(पुणे), ऋग्वेद पाटील(मुंबई). (मुली) : मेदिनी जोशी, पुणे(१:०५:९१ सेकंद), कर्वी गायकवाड(कोल्हापूर), पायल श्रीराव(मुंबई). १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक(मुले) : यश गुल्हाणे, नागपूर(१:१४:६६ सेकंद), वेंकटेश पाटील (कोल्हापूर), अथर्व देशमुख(क्रीडा प्रबोधिनी). (मुली) : करिना शंतका, मुंबई(१:१७:८७ सेकंद), वैष्णवी मोरे(पुणे), भूमिका शाह(मुंबई). १०० मीटर बटरफ्लाय(मुले) : सुचित पाटील, मुंबई(२६.४१ सेकंद), अथर्व पै(पुणे), इंद्रनिल भिडे(पुणे). (मुली) : अनन्या जोशी, मुंबई(३१:१८ सेकंद), अवनी हयातनगरकर (पुणे), पायल श्रीराव(मुंबई). 

१९ वर्षांखालील गट- १०० मीटर बॅकस्ट्रोक (मुले) : कांदुल प्रसाद, मुंबई(१:०२:०१ सेकंद), मेहलाम जी. (मुंबई), रोहित पाटील (पुणे). (मुली) : आलिया कुवावाला, पुणे (१:१६:०५ सेकंद), सना गया (मुंबई), तेजस्विता भारद्वाज (मुंबई). १०० मीटर फ्रीस्टाइल (मुले) : रुद्रांश मिश्रा, मुंबई (५५.३८ सेकंद), ईशान भुजबळ(पुणे), निखिल मिसाळ(कोल्हापूर). (मुली) : त्रिशा शिंगोटे, पुणे(१:०८:६७ सेकंद), मनस्विनी मोहिते(नागपूर), देविका मुणगेकर(पुणे). १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक(मुले) : अभिनंदन दळवी, मुंबई(१:०९:९८ सेकंद), आर्यन केदारे(मुंबई), पृथ्वीराज डांगे(कोल्हापूर). (मुली) : शारोन शाजू, पुणे(१:१९:९८ सेकंद), रिषिका बोदेले(नागपूर), सानिका देसाई(मुंबई). ५० मीटर बटरफ्लाय(मुले) : प्रथमेश सोनार, पुणे(२७:५८ सेकंद), सिद्‌धांत खोपडे (मुंबई), पुजेश डाफळे (नागपूर). (मुली) : वैष्णवी पाटील, क्रीडा प्रबोधिनी(३१:०३ सेकंद), सिद्धी कारखानीस(पुणे), आलिया कुवावाला (पुणे).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com