यशोमती ठाकूर यांना शिवप्रेमी जागा दाखवून देईल - नवनीत राणा

नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर
नवनीत राणा आणि यशोमती ठाकूरनवनीत राणा आणि यशोमती ठाकूर

अमरावती : राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने येथील राजापेठ उड्डाणपुलावर बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati shivaji maharaj) मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आला. यामुळे रविवारी सकाळपासून वाद सुरू आहे. याचा आरोप पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर करीत त्यांना निवडणुकीत शिवप्रेमी जागा दाखवून देईल, असा इशारा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिला.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत पती आमदार रवी राणाही उपस्थित होते. बुधवारी (ता. १२) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati shivaji maharaj) बसविण्यात आला होता. त्यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. यामुळे आधीपासूनच वाद उत्पन्न झाला होता. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या सांगण्यावरूनच हा पुतळा हटवला गेला. त्यांनी ‘तुम्ही हे काम करून द्या, तुम्हाला करावच लागतील’ असा दबाव पुतळा हटवण्यासाठी यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केल्याचा आरोप, खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला.

नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर
भावासमोर बहिणीवर बलात्कार अन् बहिणीने उचलला टोकाचा पाऊल

कोणती परवानगी द्यायची आहे. काय करायचे आहे, ते करा. तुम्ही हे केले नाही तर आम्ही १९ फेब्रुवारीपर्यंत राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारूच. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरजच काय आहे. त्यांच्यामुळेच हा देश आहे. त्यांच्याच देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati shivaji maharaj) बसवण्यासाठी परवानगीची गरज काय, असा प्रश्नही खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उपस्थित केला.

...जसे की आम्ही महाराष्ट्रावर अटक करणार आहो

मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास प्रचंड पोलिस बंदोबस्तात पुतळा हलविण्यात आला. यानंतर आमच्या घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आले. तीनशे ते चारशे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. जसे की आम्ही महाराष्ट्रावर हल्ला करणार आहोत. हे बरोबर नाही. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी इतका बंदोबस्त करा म्हणजे महाराष्ट्राचे नाव मोठे होईल, असेही खासदार नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com