यशवंत स्टेडियम पाडणार!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

नागपूर - धंतोलीतील यशवंत स्टेडियम व परिसरात नवीन भव्य इमारत उभी करण्यासाठी "मास्टर प्लान‘ तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. यशवंत स्टेडियम पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूर - धंतोलीतील यशवंत स्टेडियम व परिसरात नवीन भव्य इमारत उभी करण्यासाठी "मास्टर प्लान‘ तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. यशवंत स्टेडियम पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान आणि मोकळा परिसर 13 एकरमध्ये आहे. ही जागा नझूलची असून यशवंत स्टेडियम येथील दुकाने लिजवर आहेत. येथील अनेक दुकानांची लिज संपुष्टात आली आहे. त्याचे नूतनीकरण केले नाही. नुकताच जिल्हा प्रशासनाने या दुकानाबाबतचा अहवाल शासनाला पाठविला. शासनाकडून लिज संपलेली जागा परत घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यशवंत स्टेडियमच्या विकासासाठी नवीन मास्टर प्लान तयार करण्याच्या सूचना दिल्या. येथील 13 एकरवर नवीन बांधकाम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी संपूर्ण परिसर विकासाचा "मास्टर प्लान‘ तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सोबतच पटवर्धन मैदान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा आराखडा तयार करण्यासही त्यांनी सांगितले. पटवर्धन मैदान येथील जागेची लिज संपुष्टात आल्याने स्मारकनिर्मितीचे काम थांबले आहे. त्यामुळे येथे यशवंत स्टेडियमच्या विकासासोबतच आंबेडकर स्मारकाचे बांधकाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नासुप्रला धरले धारेवर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नासुप्रच्या अधिकाऱ्यांना बैठकीत चांगलेच धारेवर धरले. नासुप्र सामान्य नागरिकांची अडवणूक करीत असून लक्ष्मी दर्शनाशिवाय येथे कामच होत नसल्याचे सांगून अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाजूला करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

निर्णयाविरोधात राज्य सुप्रीम कोर्टात
शासनाने डिसेंबर 2015 पर्यंतचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याला उच्च न्यायालयाकडून स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले.

Web Title: Yashwant Stadium!