यवतमाळ : एटीएम फोडून साडेआठ लाख लंपास

राळेगावातील घटना; काही तासांतच चोरटे जेरबंद
crime
crimesakal
Updated on: 

राळेगाव (जि. यवतमाळ) : एकाच आठवड्यात दोनवेळा ए. टी. एम. फोडले. पहिल्यांदा पोलिस वेळेवर पोहचल्याने रक्कम वाचली. परंतु, दुसर्‍यांदा मात्र आठ लाख आठ लाख एकोणसत्तर हजार रूपये चोरट्यांनी पळविले.

 शनिवारी (ता.2) पहाटे दोन ते अडीच वाजताच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे बस स्थानकाजवळील ए.टी.एम. फोडून आठ लाख एकोणसत्तर हजार रूपये लंपास केले. या खळबळजनक घटनेने पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आधीसुद्धा काही दिवसांपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडिया चे ए.टी.एम.फोडण्याचा प्रयत्न झाला होता.

crime
शिरुर : मतदार संघात 27 हजार कोटींची कामे प्रस्तावित व काही झाली

परंतु, अवघ्या काही तासात चोर पकडल्या गेले होते. यावेळी मात्र चोरट्यांनी डाव साधला. आज पहाटे घडलेल्या घटनेची रितसर तक्रार ए.टी.एम.च्या कंपनी कडून देण्यात आली आहे. सेंसर्स जिथे रूपये असतात  तिथे नसतात. त्यामुळे ए.टी.एम.फोडून रूपये चोरून नेण्यात चोरटे यशस्वी झाले, अशी चर्चा सुरू आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट दिली आहे. ए.पी.आय. अमोल मुडे तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com