esakal | ‘एटीएम’मधून पैसे उडविणारी टोळी जेरबंद; बिहारमध्ये कारवाई | Crime
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

‘एटीएम’मधून पैसे उडविणारी टोळी जेरबंद; बिहारमध्ये कारवाई

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ - एटीएम कार्ड क्लोन करून नागरिकांचे पैसे उडविणार्‍या आंतरराज्यीय टोळीला अखेर जेरबंद करण्यात आले. सायबर सेलच्या पथकाने बिहार राज्यात जाऊन ही कारवाई केली. त्यांच्याकडून एटीएम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. सुकेशकुमार अनिल सिंग (जि. गया), सुधीलकुमार निर्मल पांडे (जि. गया, बिहार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

मागील काही दिवसांत नागरिकांच्या बँक खात्यातील पैसे आपोआप विड्रॉल होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 15 सप्टेंबरला यवतमाळ शहरातील साई सत्यज्योत मंगल कार्यालय येथील एसबीआय एटीएममध्ये व 16 सप्टेंबर रोजी गोधणी मार्गावरील एटीएममध्ये इंटरर्नल क्लोनर बसवून त्याद्वारे एटीएम कार्ड क्लोन केले व त्याद्वारे बनावट एटीएम कार्ड तयार करून नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले.

हेही वाचा: पोटच्या मुलीशी गैरवर्तन; बापाचे कृत्य वाचून बसेल धक्का

कार्ड क्लोनिंग असल्याचे स्पष्ट होताच सायबर पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारावर गुुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करीत थेट बिहार गाठले. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दोघांच्या ताब्यातून इंटरर्नल एटीएम स्कॅनर, हॅन्ड एटीएम स्कॅनर, बनावट एटीएम तयार करण्यासाठी लागणारे स्किमर, 15 एटीएम व रोख रक्कम असा एकूण एक लाख 28 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांनी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, झारखंडमध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले आहेत.

एटीएम हाताळताना ही काळजी आवश्यक

एटीएममध्ये एका वेळी एकाच व्यक्तीने प्रवेश करावा, दुसरा व्यक्ती असल्यास टोकावे, आत काही संशयित प्रकार आढळून आल्यास सुरक्षा रक्षकाकडून सहानिशा करून घ्यवी, एटीएम कोड कुणालाही दिसणार नाही, अशा पद्घतीने टाकावा, एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नये, एटीएम कार्डवर पासवर्ड लिहू नये, निर्जनस्थळी असलेल्या एटीएम मशीनचा वापर टाळावा, एटीएम मशीनच्या कीपॅडजवळ छुपा कॅमेरा तर लावण्यात आला नाही, याची पाहणी करावी, फसवणूक झाल्यास एटीएम ब्लॉक करावे, सर्वात प्रथम बँकेत तक्रार देवून त्वरीत डिसप्यूट अर्ज भरून द्यावा, ग्राहकांनी अशा प्रकारे काळजी घेण्याचे आवाहन पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

loading image
go to top