esakal | यवतमाळ : सततच्या पावसाने शेतकरी त्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

 सततच्या पावसामुळे

यवतमाळ : सततच्या पावसाने शेतकरी त्रस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राळेगाव (जि. यवतमाळ) : गेल्या आठ दिवसांपासून शहरासह तालुक्यात सतत पाऊस पडत असल्याने शेतीतील सगळी कामे ठप्प आहेत. सततच्या पावसाने उत्पन्नातही मोठी घट येऊ शकते. त्यामुळे आता पावसाला थांब असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यावर आली आहे.

आकाशात ढग जमा झाले की लगेच पावसाला सुरूवात होते. पाऊसही पडतो गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. बहुतांश नदी नाले ओसंडून वाहू लागले. या पावसाने शेतातील विहिरीही तुडुंब भरल्या आहेत. पण या पावसाने पाणबसन तसेच चिबड शेताचे मोठे नुकसान केले. यावर्षी पाऊस आला की खूपच येतो. त्यामुळे असे शेत पडीक राहायची भीती निर्माण झाली आहे. कारण शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे. ज्या शेतातील पाणी निघत नाही, त्या शेतातील पीक पिवळे पडून मरण्याची भीती आहे.

हेही वाचा: कामास गती न मिळाल्यास पुन्हा रस्त्यावर - चिमणराव पाटील

याआधीही त्या शेतात केवळ पन्नास टक्केच पीक होते. सततच्या पावसाने शेतातील डवरणी, निंदण ही कामे बंद आहेत त्यामुळे पाऊस कमी होताच शेतात तणाचे साम्राज्य होईल तणाचे व्यवस्थपण करता करता शेतकर्‍यांचे नाकीनऊ येतील यात शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. सगळ्यांच शेतकर्‍यांचे निंदन एकाचवेळी येतील यामुळे मजूर या गोष्टीचा फायदा घेऊन मजुरीही वाढवू शकते. सतत पाऊस पडत असल्याने कपाशीवर गुलाबी बोन्डअळीसह इतरही रोगराई येऊ शकते. सततच्या पावसाने कपाशीवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला झाडाच्या खाली पातीफुलांचा सडा पडला आहे. झाडाला तयार असलेली बाँडे सडून खाली पडली आहे. तयार झालेला माल अशारीतीने खाली पडत असल्याने शेतकर्‍यांचा जीव तिळतीळ तुटत आहे.

हा माल तयार करण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतात चार ते पाच फवारे मारले. हा सगळा खर्च व्यर्थ गेल्यात जमा आहे. नवीन माल धरण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. पावसाचा फटका कपाशी पिकासह सोयाबीन पिकालाही बसला ज्या शेतकर्‍यांचे सोयाबीन पीक भरले त्या शेतकर्‍यांच्या सोयाबीनला अति पावसामुळे कोंब फुटू शकते तसेच पाऊस गेल्यावर ऊन पडल्यास हे सोयाबीनचे दाणे फुटूही शकते तसेच सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन पिकांत मोठ्या प्रमाणात तण वाढले. ज्यामुळे सोयाबीनची सोंगणी करताना शेतकर्‍यांना अधिक कसरत करावी लागणार आहे शिवाय खर्चही वाढणार आहे.

हेही वाचा: ‘हीलींग हँड्स हर्ब्स’ला आयुर्वेदिक उत्पादनांचे भारतीय पेटंट

तूर, ज्वारी पिकाला फटका

अति पावसाचा फटका तूर पिकालाही बसला आहे. पाणबसन शेतातील तूर जळाली तर काही शेतातील तुरी ह्या पिवळ्या पडल्या. ज्वारीच्या कणसाला अति पावसाने कोंब फुटली आहेत. एकंदरीत अति पावसाचा फटका सर्वच पिकाला बसला असून शेतकरी या पावसामुळे त्रस्त झाले आहेत. हा पाऊस हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून तर नेणार नाही ना, अशी भीती शेतकर्‍यांना वाटत आहे.

loading image
go to top