esakal | दोन विद्यार्थ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; पोहणे जिवावर बेतले
sakal

बोलून बातमी शोधा

दोन विद्यार्थ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; पोहणे जिवावर बेतले

दोन विद्यार्थ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; पोहणे जिवावर बेतले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाभूळगाव (जि. यवतमाळ) : शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात पोहताना बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. २०) दुपारी तालुक्यातील नांदुरा खुर्द येथे घडली. आकाश राजेंद्र दुतकोर (वय १५, रा. नांदुरा खुर्द) व चेतन सुरेश मसराम (वय १५, रा. नांदुरा) अशी मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. (Yavatmal-Crime-News-Two-students-died-Death-by-drowning-nad86)

नांदुरा खुर्द शेतशिवारातील एका शेतात पिकाला खत टाकण्यासाठी ही शाळकरी मुले गेलेली होती. काम संपवून घरी परत येत असताना त्यांना पाण्याने भरलेल्या शेततळ्यात पोहण्याचा मोह झाला. त्यानंतर दोघांनी शेततळ्यात सरळ उडी घेतली. शेततळ्यात साचलेला गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने ते दोघेही चिखलात फसले. उडी घेतलेली दोन्ही मुले पाण्याच्या बाहेर न आल्याने त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांनी या घटनेची माहिती नांदुरा खुर्द येथील ग्रामस्थांना दिली.

हेही वाचा: सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेत शेततळ्यातून मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती स्थानिक पोलिस पाटील यांनी बाभूळगाव पोलिस ठाण्याला देणे अपेक्षित होते. मात्र, वृत्तलिहीपर्यंत घटनेची माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. घटनेसंदर्भातील व्हिडिओ सामाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. त्यानंतर घटनेचा अहवाल पिंपरी इजारा येथील तलाठी एच. एम. परोपटे यांनी बाभूळगावचे तहसीलदार विठ्ठल कुंभरे यांना दिल्याचे सांगण्यात आले.

(Yavatmal-Crime-News-Two-students-died-Death-by-drowning-nad86)

loading image