मोदी सरकारला जबाबदार धरून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

यवतमाळ : कर्जमाफीचा लाभ नाही. बोंडअळीने पिकाची झालेली नासाडी. कर्जाचा वाढता डोंगर अशा विविध समस्यांनी घेरलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. ही घटना घाटंजी तालुक्‍यातील करणवाडी (राजूरवाडी) येथे बुधवारी (ता. दहा) सकाळी घडली. शंकर भाऊराव चायरे (वय 55), असे मृताचे नाव आहे. चायरे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मोदी सरकारला जबाबदार ठरविले आहे.

सकाळी शेतात गेल्यानंतर शंकर चायरे यांनी एका झाडाला गळफास घेतला. मात्र, दोर तुटल्याने जीव वाचला. परंतु, आत्महत्येचा निर्धार केल्यामुळे त्यांनी विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्यांना तत्काळ पांढरकवडा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्‍टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला दिला. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शेतकऱ्याने अखेरचा श्‍वास घेतला. शंकर चायरे या शेतकऱ्याकडे सहा एकर शेती असून, बोंडअळीने पिकाची नासाडी झाली. लागवडीचा खर्चही निघाला नाही. शिवाय कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे मोदी सरकारला जबाबदार धरत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. मोठी मुलगी जयश्री बी.एस्सी. द्वितीय वर्षाला यवतमाळ येथे शिक्षण घेत आहे. भाग्यश्री बी.ए. द्वितीय वर्षाला, धनश्री दहावीला तर मुलगा आकाश नववीत शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी घाटंजी तालुक्‍यातील टिटवी येथील प्रकाश मानगावकर या तरुण शेतकऱ्याने सागवान झाडाच्या पानावर मजकूर लिहून मोदींना जबाबदार धरत आत्महत्या केली होती. आता पुन्हा दुसरी घटना घडल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. चायरे यांच्या आत्महत्येची गंभीर दाखल घेत शेतकरी मिशनचे अध्यक्ष व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी 11 एप्रिलला त्यांच्या कुटुंबाला सांत्वना भेट देणार आहेत.

चिठ्ठीतून भावनिक आवाहन
आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने एक चिठ्ठी लिहिली. सर्वप्रथम पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आजी, माजी मंत्री, पदाधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली. आपल्या कुटुंबाला दोन्ही भावांनी आधार द्यावा, असे भावनिक आवाहन केले. शिवाय पत्नी, तीन मुली, मुलगा यांना "गोडगोड' पापा दिला.

Web Title: yavatmal farmer suicide news

फोटो गॅलरी