esakal | अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मंत्री सांदिपान भूमरे; ताफा थांबवून जखमींना रुग्णालयात केलं दाखल

बोलून बातमी शोधा

null

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मंत्री सांदिपान भूमरे; ताफा थांबवून जखमींना रुग्णालयात केलं दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : वणी, पांढरकवडा, मारेगाव, राळेगाव येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करून यवतमाळ येथे परत येत असतांना पांढरकवडा ते यवतमाळ मार्गावर एका रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्या ठिकाणी एका रिक्षामध्ये दहा ते 12 व्यक्ती होते. त्यातील अनेक जखमी होते आणि त्यांना कोणी मदत देत नव्हते.

तसेच त्यांच्यासाठी कोणी थांबत नसताना पालकमंत्री सांदिपान भूमरे यांनी आपला ताफा त्या ठिकाणी थांबवला व जखमींना पांढरकवडा येथील रुग्णालयात रवाना केले. याप्रसंगी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हेही त्यांच्यासोबत होते.

हेही वाचा: दिग्रस तालुक्‍यातील वेअर हाउसला भीषण आग; तब्बल दोन कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून सांदिपान भूमरे यांनी पदभार स्वीकारला. अपघातग्रस्तांची मदत करून भुमरे यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.