Yavatmal : चोरट्याचा पत्रकारावर प्राणघातक हल्ला

पत्रकार संघटना आक्रमक; जिल्हा पोलिस अधीक्षक वणीत दाखल
Yavatmal
Yavatmal sakal

वणी (जि. यवतमाळ) : गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात चोरीच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे. आता चोरटे चोरीसोबतच प्राणघातक हल्लेही करताना दिसून येत आहेत. बुधवारी पहाटे पाच वाजता येथील गाडगे बाबा चौकात वास्तव्यास असलेल्या पत्रकाराच्या घरी चोरी करून लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे खाकीचा धाक संपला का, अशी चर्चा वणीकरांत सुरू आहे.

आसीफ शेख (वय ५२) असे चोराने हल्ला केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. संत गाड गेबाबा चौक परिसरात ते वास्तव्यास आहेत. घटनेच्या दिवशी आपल्या परिवारासह वरच्या मजल्यावर झोपले होते. तत्पूर्वी त्यांनी खालील घराला कुलूपबंद केले होते. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घर कुलूपबंद असल्याची संधी साधून चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील १५ हजार रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेऊन वरील मजल्यावरील पायऱ्या चढत असताना.

शतपावलीकरिता निघालेल्या आशिफ शेख यांचा चोराशी आमना सामना होताच चारेट्याने हातात असलेल्या लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार करून चोरटा पसार झाला. घडलेल्या घटनेने अशिफ शेख प्रचंड भयभीत झाले. डोक्यावरून रक्ताच्या धारा वाहत असताना शेजारी असणाऱ्या नातेवाइकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून नागपूर येथे हलविण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पत्रकार संघटना आक्रमक

घडलेली घटना अतिशय निदंनीय असून, वणी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पत्रकार संघटनांनी पोलिस अधीक्षक यांना निवेदन पाठवून वणीकरांची व्यथा मांडली व ठाणेदार यांच्या बदलीची मागणी केली. याची दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी वणी गाठून पत्रकारांशी संवाद साधला.

आमदारांनी केली बदलीची मागणी

वणी शहरात वाढत असलेल्या चोरांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची दखल आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी तातडीने घेतली. रुग्णालयात जाऊन जखमी आशिफ शेख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर मिना यांना फोनद्वारे संपर्क करून ठाणेदार महल्ले यांची उचलबांगडी करण्याची मागणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com