

High Stakes Drama: BJP and Shinde Sena Locked in Intense Tug-of-War Over Yavatmal MLC Seat
यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (ता. १) हा अखेरचा दिवस असल्याने जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. आतापर्यंत केवळ एकच अर्ज दाखल झाला असला तरी सोमवारी राजकीय पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राजकीय जत्रेचे चित्र पाहायला मिळणार आहे.