यवतमाळ : थकबाकीने महावितरणचा खिसा रिकामाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidarbha

यवतमाळ : थकबाकीने महावितरणचा खिसा रिकामाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : आर्थिक परिस्थितीमुळे महावितरणचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ग्राहकांकडून वीजबिले वेळेवर भरली जात नाही. त्यामुळे अमरावती परिमंडळातील थकबाकी नऊशे कोटींवर पोहोचली आहे. या थकीत रकमेमुळे वीज महावितरण कंपनीचा खिसा रिकामा झाला.

महावितरणची सध्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळेच दिवाळीपूर्वी थकीत वीजबिलाची वसुली मोहीम महावितरणने राबविली होती. या मोहिमेमुळे अनेक ग्राहकांना अंधारात राहावे लागले होते. कोळसा टंचाईमुळे राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाची झळ ग्राहकांना बसण्याची शक्यता होती. ती ग्राहकांना बसू नये, यासाठी महावितरणने धडपड केली. त्याचा परिणाम दिवाळीत कुठेही भारनियमन झाले नाही. असे असले तरी थकीत रक्कम मोठी आहे. काही ग्राहकांनी वीजबिल भरले, तर बहुतांश नागरिकांनी वीजबिल माफ होईल, या आशेने अजूनही भरलेले नाही. लॉकडाउनच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे काहींजवळ वीजबिल भरण्यासाठी पैसेच नाहीत. अशा दुहेरी पेचात ग्राहक अडकले आहेत.

हेही वाचा: दारू विकणारे हात लागले उद्योगाला

असे असले तरी थकबाकीमुळे आता महावितरणचा खिसा रिकामा होण्याची वेळ आली आहे. एकट्या अमरावती परिमंडळाची थकीत रक्कम नऊशे कोटी रुपयांवर आहे. त्यामुळे आता वीज महावितरण कंपनीसमोर संकटे उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे सध्यातरी महावितरणकडून सक्तीची वसुली बंद आहे. मात्र, वाढती थकबाकी पाहता ती वेळ कधीही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे. त्यामुळे नागरिक आता थकीत रक्कम भरतात की, महावितरण वसुली मोहीम राबविणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: 'मुंबईत रस्त्यांचे "रस्ते" लागले, तिच थूकपट्टी...'; भाजपाचा हल्लाबोल

यवतमाळ जिल्ह्यातील स्थिती

वर्गवारी-ग्राहक- थकीत रक्कम

घरगुती-२,५,१४९-६८ कोटी ५६ लाख

औद्योगिक-३,१८१-१२ कोटी २६ लाख

पथदिवे, पाणीपुरवठा, इतर ५३० कोटी

loading image
go to top