जनजागृतीनंतरही कीटकनाशक फवारणीतून विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

यवतमाळ : कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांना विषबाधा होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेत जनजागृती केली जात आहे. यंदाही शेतकरी विषबाधित होत आहेत. शुक्रवारी (ता. 10) तीन शेतकरी बाधित झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिलीप शिवलाल राठोड (वय 46, रा. सोनवाढोणा), सुधीर विष्णू बोरकर (वय 32, रा. लोणी, ता. आर्णी), अशी बाधितांची नावे आहेत. त्यांनी फवारणी करताना सुरक्षाकीटचा वापर केला नव्हता. खरीप हंगामात पिकांची वाढ होत असतानाच त्यावर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी फवारणी करीत आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने शेतशिवारात कीटकनाशक फवारणीला वेग आला आहे. फवारणी कीट उपलब्ध करून दिल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत सुरक्षाकिट पोहोचली नाही. कृषी विभागाकडून होणारी जनजागृती कागदोपत्रीच राहिली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन रुग्ण दाखल झाले होते. ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेपर्यंत ही संख्या 36 वर पोहोचली आहे. 23 रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता 13 बाधित शेतकऱ्यांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. फवारणीचा फेर असाच सुरू राहिल्यास फवारणी बाधितांच्या संख्येत चिंताजनक वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: yavatmal news