यवतमाळात प्रथमच करडा तुतवारची नोंद

file photo
file photo

यवतमाळ : उत्तर रशिया व सैबेरियातून भारतीय उपखंडात शीतऋतूदरम्यान येणारा करडा तुतवार (टेरेक सॅंडपायपर) व शास्त्रीय नाव झेनस सिनेरेस हा पक्षी परतीच्या प्रवासात असताना यवतमाळजवळील जामवाडी धरणावर आढळून आला. प्राणिशास्त्राचे प्रा. डॉ. प्रवीण जोशी व डॉ. दीपक दाभेरे यांनी या पक्ष्याची नोंद घेतली आहे.
या पक्ष्याचा वावर मुख्यतः सागरी किनारे, भरती-ओहोटीच्या काळातील खाड्या, खाऱ्या पाण्याचे तळे या परिसंस्थेत असतो. बुधवारी (ता. आठ) सकाळी पक्षिनिरीक्षणादरम्यान लांब, सडपातळ, वर वळलेली चोच आणि नारिंगी पिवळ्या रंगाचे आखूड पाय यावरून हा पक्षी सहज वेगळा ओळखता आला. प्रथमच हा पक्षी यवतमाळ जिल्ह्यात आढळल्याचे प्रा. प्रवीण जोशी यांनी सांगितले. भारतात मुंबईचा सागरी किनारा, केरळ, गुजरातच्या समुद्री भागात हे पक्षी ऑक्‍टोबर ते एप्रिल महिन्यादरम्यान आढळतात. परंतु, परतीच्या स्थलांतरादरम्यान यवतमाळच्या जलाशयावर काहीकाळ विश्रांतीसाठी थांबले असतानाची नोंद महत्त्वाची आहे. दुर्मीळ नोंदी आम्हाला ऊर्जा देतात व नव्याने पक्षिनिरीक्षणासाठी सक्रिय करतात, असेही डॉ. प्रवीण जोशी व डॉ. दीपक दाभेरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com