esakal | यवतमाळ : झिरपुरवाडी पाझर तलावांच्या भिंतीला भगदाड
sakal

बोलून बातमी शोधा

yavatmal

यवतमाळ : झिरपुरवाडी पाझर तलावांच्या भिंतीला भगदाड

sakal_logo
By
ऋषिकेश हिरास

दिग्रस (जि. यवतमाळ) : सारस पक्षाने झिरपुरवाडी येथील पाझर तलावाच्या भिंतीला छिद्र केल्याने तडा जाऊन भगदाड पडल्याची घटना घडली. त्यामुळे तलावाची भिंत फुटली. त्यामुळे तलावातील पाणी जवळपास असलेल्या शेतात शिरल्याने काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र ही बाब वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील झिरपुरवाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाझर तलावावर नेहमी विविध पक्षांची वर्दळ असते. या तलावावर सासर पक्षी देखील यायचे. या पक्षाची चोच लांब आणि अनुकुचीदार असते. याच चोचीने सारस पक्षाने बसण्यासाठी म्हणून मातीत छिद्र केले. असे करत असतांना तलावाच्या भिंतीला तडे गेले. अशात गेल्या काही दिवसंपासून संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसामुळे तलावातील पाण्याची पातळी वाढली. वाढलेल्या पाणीपातळीमुळे त्या तडा गेलेल्या भिंतीवर ताण आला आणि त्या भिंतीला भगदाड पडले. अगोदर तलावातून छोटी धार येत होती मात्र भगदाड पडल्यानंतर धार वाढली. मात्र ही बाब तेव्हाच लक्षात आल्याने जास्त नुकसान झाले नाही.

हेही वाचा: अकोला : यंदाही फवारणीचा फास; १४ विषबाधितांवर उपचार सुरू

पाझर तलावाला भागदाग पपडल्याची माहिती मिळताच ग्रामपंचायत च्या सरपंचांनी तलावाकडे धाव घेऊन तात्काळ ही माहिती तहसीलदार राजेश वझीरे व उपविभागीय सिंचन विभाग पुसद यांना दिली. त्यानंतर तात्काळ भागदाड बुजविण्यासाठी युद्धस्तरावर कार्य करण्यात आले. पाझर तलावाला भगदाड पडल्याची घटना कळताच तहसीलदार राजेश वझीरे, झिरपुरवाडीचे सरपंच पुरुषोत्तम कुडवे, जि.प.सदस्य रुक्मिणी उकंडे, विष्णू उकंडे, मंडळ अधिकारी जाधव, तलाठी चंदेल, ग्रामसेवक प्रशांत दुधे, शंकर जुडे, सदस्य सुनील भस्मे, सदस्य विलास डहाणे, सदस्य भिमराव डहाणे, दिलीप पवार यांनी पाझर तलावाची तसेच नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तलावाला लागुनच असलेली झिरपुरवाडी गावची पाणी पुरवठा योजनेची विहीर गाळली असल्याने गावातील पाणी पुरवठा तुर्तास तरी खोळंबला आहे.

तलावाचे आऊट लेट जेसीबीने खोदुन केले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जास्त नुकसान होणार नाही. भितीला पडलेलं भगदाड पॅचिंग करुन दुरुस्ती काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

- कोसारे, पुसदचे उपअभियंता, उपविभागीय सिंचन विभाग

loading image
go to top