लूटमार करणाऱ्या तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

यवतमाळ - पुणे जिल्ह्यातील रांजणगाव हद्दीत मोटारीतून जाणाऱ्या व्यक्तीला लुटणाऱ्या तीन संशयितांना यवतमाळ येथून मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पुणे व यवतमाळ पोलिसांनी संयुक्तपणे केली.

यवतमाळ - पुणे जिल्ह्यातील रांजणगाव हद्दीत मोटारीतून जाणाऱ्या व्यक्तीला लुटणाऱ्या तीन संशयितांना यवतमाळ येथून मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पुणे व यवतमाळ पोलिसांनी संयुक्तपणे केली.

रोनक राजेश यादव (जामनकरनगर, यवतमाळ), सोनू सुजितसिंग ठाकूर (आठवडी बाजार, यवतमाळ) आणि करण प्रेमदास पवार (जामनकरनगर, यवतमाळ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश हिरामण सोनआंबटे हे 16 जूनला मोटारीने पुणे येथून नगर रस्त्याने शिर्डीकडे जात होते. त्या वेळी लिफ्ट मागण्याचा बहाणा करून पाच जण मोटारीमध्ये बसले. त्यांनी सोनआंबटे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हात बांधून मारहाण केली. त्यानंतर मोटार रांजणगाव गणपती मंदिराच्या रस्त्याला नेऊन सोनआंबटे यांच्याकडील चार हजार 500 रुपये रोकड आणि व मोटार पळवून नेली.

Web Title: yavatmal vidarbha news three criminal arrested