esakal | शेतातील महिलांना गाठून करायचा हे कृत्य...
sakal

बोलून बातमी शोधा

knife

पांढरकवडा, मुकुटबन, मारेगाव, घाटंजी हद्दीतील शेतात महिलांच्या अंगावरील दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूर येथे घरफोडी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून अभिलेखावरील जबरी चोरी व घरफोडी असे सात गुन्हे उघडकीस आणण्यात आले. पुढील तपासासाठी चोरट्याला मुकुटबन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

शेतातील महिलांना गाठून करायचा हे कृत्य...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शेतात काम करणार्‍या महिलांना चाकूचा धाक दाखवून मुद्देमाल लुटणार्‍या चोरट्याच्या हातात अखेर बेड्या पडल्या आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता.23) ही कारवाई केली. सात गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला.

दत्ता सुरेश लिंगनवार (वय 30, रा. सदोबा सावळी, ता. आर्णी) असे अट्टल चोरट्याचे नाव आहे. पांढरकवडा, मुकुटबन, मारेगाव, घाटंजी परिसरात शेतात काम करणार्‍या मजूर महिलांना चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनांना आळा घालण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले. यात पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेळके व पीएसआय श्रीकांत जिंदमवार यांचा समावेश होता. पोलिस गेल्या काही दिवसांपासून रेकॉर्डवरील चोरट्यावर बारीक लक्ष ठेवून होते. दरम्यान, दत्ता लिंगनवार याला गुरुवारी सदोबा सावळी येथून ताब्यात घेतले. पोलिस रेकॉर्डवरील सराईत चोरटा असल्याने विश्‍वासात घेऊन विचारपूस केली. त्याने दुचाकी व दोन मोबाइल चोरीचे असल्याचे सांगितले.

- राज्यात  दारूबंदीचा पोरखेळ : चंद्रपुरातून  हटविण्याच्या हालचाली तर या जिल्ह्यात होणार दारूबंदी...

पांढरकवडा, मुकुटबन, मारेगाव, घाटंजी हद्दीतील शेतात महिलांच्या अंगावरील दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूर येथे घरफोडी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून अभिलेखावरील जबरी चोरी व घरफोडी असे सात गुन्हे उघडकीस आणण्यात आले. पुढील तपासासाठी चोरट्याला मुकुटबन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, एसडीपीओ सुशीलकुमार नायक, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नीलेश शेळके, पीएसआय श्रीकांत जिंदमवार, गोपाल वास्टर, गजानन डोंगरे, मुन्ना आडे, उल्हास कुरकुटे, पंकज पातुरकर, कविश पाळेकर, किशोर झेंडेकर, नागेश वास्टर, पंकज बेले, प्रवीण कुथे आदींनी केली.

तेलंगणा, अमरावतीतही गुन्हे
शेतातील महिलांकडून दागिने चोरीच्या घटना तेलंगणा राज्यातील आदिलाबाद व अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथेही घडल्या आहेत. याच चोरट्याकडून या घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

loading image