esakal | हेच महाराजांचे खरे मावळे... बाईक रॅली थांबवून रुग्णवाहिकेला मोकळी करून दिली वाट
sakal

बोलून बातमी शोधा

yavatmal ambulence

शिवतीर्थापासून सुरू झालेली रॅली शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत एलआयसी चौकात पोहोचली. याठिकाणी युवक, युवतींच्या गर्दीने उंचाक गाठला. अशास्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून रुग्णवाहिका ‘सायरन’वाजवत येत असल्याचे शिवप्रेमीना दिसले. रॅलीमुळे आधीच रस्ते बंद होते. अशास्थिती शिवप्रेमींनी संवेलनशील भूमिका घेउन दुचाकी रॅली थांबविली.

हेच महाराजांचे खरे मावळे... बाईक रॅली थांबवून रुग्णवाहिकेला मोकळी करून दिली वाट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : डीजेवर सुरू असलेले जोशपूर्ण गीत, तरुणाईचे सळसळते रक्त, युवकांचा जल्लोष, जय जिजाऊ, जय शिवरायांचा जयघोष असे अतिउत्ताहाचे वातावरण असतानाही तरुण शिवप्रेमींनी दुचाकी रॅली थांबवून रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त शहरात सकाळपासून उत्साहाचे वातावरण आहे. शिवजन्मोत्सव असल्याने तरुणाईचा जल्लोष मोठ्या प्रमाणात सुरू होते. शहरात ठिकठिकाणी लागलेले भगवे पताका, डिजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, युवक, युवतींची दुचाकी रॅली असे जोशपूर्ण वातावरण सकाळपासून शहरात होते. बुधवार (ता.19) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याने पहाटेपासून शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात सर्वांत लक्षवेधी ठरली ती तरुण,तरुणीचा सहभाग असलेली दुचाकी रॅली.

दानापूर एक्स्प्रेस अर्चना अढावच्या कामगिरीला शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराचे कोंदण

शिवतीर्थापासून सुरू झालेली रॅली शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत एलआयसी चौकात पोहोचली. याठिकाणी युवक, युवतींच्या गर्दीने उंचाक गाठला. अशास्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून रुग्णवाहिका ‘सायरन’वाजवत येत असल्याचे शिवप्रेमीना दिसले. रॅलीमुळे आधीच रस्ते बंद होते. अशास्थिती शिवप्रेमींनी संवेलनशील भूमिका घेउन दुचाकी रॅली थांबविली.

आणखी तीन दिवस बँका बंद; जाणून घ्या कारण

तरुणाईने घडविले माणुसकीचे दर्शन
थांबलेल्या वाहनचालकांना बाजूला करीत रुग्णवाहिकेला क्षणात वाट मोकळी करून दिली. यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाने तरुणाईच्या या कार्याला सलाम केला. विशेष म्हणजे, रॅली थांबल्यानंतर कुठलाही गोंधळ किंवा गडबड कुणीही केली नाही. यामुळे खर्‍या अर्थांनी हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण तरुणाईने लक्षात ठेवल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांच्या तोडून बाहेर आल्या. रॅलीचे नियोजन बिपीन चौधरी, नितीन मिर्झापूरे, मयुर वानखडे, सचीन येवले, शुभम लांडगे, अंकुश वानखडे, श्रीकांत काकडे यांच्या नेतृत्वात सुरू होते.