Yavatmal ZP Exam Controversy
esakal
यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत ‘मिशन कॉम्पिटेटिव्ह एक्सलन्स’ या उपक्रमाद्वारे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत, उच्च जात कोणती? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ही परीक्षा घेण्यात आली. जातीव्यवस्थेवर विचारण्यात आलेल्या या प्रश्नानंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. अशा प्रश्नामुळे मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती आता अनेकांकडून व्यक्त केली जाते आहे.