आर्णीची कन्या देतेय राज्याच्या राजधानीत सेवा, वाचा तिची शौर्यगाथा...

Yavatmal Komal Tapadia corona frontiers in Mumbai
Yavatmal Komal Tapadia corona frontiers in Mumbai

आर्णी (जि. यवतमाळ) : सध्या सारेच कोरोनाच्या वैश्‍विक संकटाने त्रस्त आहेत. प्रत्येकाच्या मनात कोरोनाबाबत भय निर्माण झाले आहे. स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची प्रत्येकाची धडपड सुरू असताना कोरोनाच्या या लढाईत सर्वांत पुढे डॉक्‍टर्स, परिचारिका व आरोग्य कर्मचारी आहेत. ते फ्रंटलाइन वॉरिअर्स असल्याचा उल्लेख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात'मध्ये केला. आर्णीची कन्या कोमल तापडिया हीदेखील फ्रंटलाइन वॉरिअर्स म्हणून कोरानाच्या या वैश्‍विक युद्धात सहभागी झाली. ती मुंबईतील केईएम हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डात कर्तव्यावर आहे.

"सेवा परम धर्म...' असे म्हणतात. ज्या सेवेसाठी आपण शिक्षण घेत आहोत, त्या शिक्षणाचा फायदा लोकांना करून देणे हाच खरा शिक्षणाचा धर्म आहे. हाच धर्म पाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न डॉ. कोमल तापडिया करीत आहे. आर्णी येथील व्यापारी व खजाना ड्रेसेसचे संचालक अशोक तापडिया यांची ती कन्या. कोमलने एमबीबीएसची पदवी शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर येथून पूर्ण केली. त्यानंतर तिने उच्च शिक्षणासाठी केईएम हॉस्पिटल परेल येथे एम. डी. (भूलतज्ज्ञ) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

देशात आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर ती सेव्हन हिल हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णसेवेत जवळपास रोज दहा तास सेवेत असते. आर्णीची मुलगी मुंबईसारख्या ठिकाणी कोरोनाचा प्रचंड प्रकोप असताना स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आपले शिक्षण चालू असतानादेखील रुग्णसेवा ही एक संधी समजून सेवा देत आहेत. ही आर्णीकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

 
घरीच रहा, स्वत:चा बचाव करा
मला वैद्यकीय क्षेत्रात सेवा करण्याची इच्छा आहे. त्यासाठीच मी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. अशावेळी आलेली कोरोनासारखी महामारी भयंकर आहे. या काळात रुग्णाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. कोरोना खरंच भयंकर आहे. त्याच्यापासून बचाव करायचा असेल तर नागरिकांनी घरीच राहणे योग्य आहे. स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे.
-डॉ. कोमल तापडिया, भूलतज्ज्ञ, केईएम हॉस्पिटल, मुंबई  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com