येरळीत रात्री भररस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

नांदुरा : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील जिगाव धरण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या येरळी येथे (ता.१८) रात्री १० वाजेदरम्यान गावातीलच भररस्त्यात दोन परिवारात शुल्लक कारणावरून वाद झाला. त्यात एका तरुणांचा लाठ्या काठ्या व कूऱ्हाडीने घाव घालून खून झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदुरा तालुक्यातील येरळी येथील रहिवासी योगेश धोंडू घुये (वय २७) (ता.१८) रात्री १० वाजता आपल्या घरातून जात असतांना शेजारीच राहणारे आरोपी दत्ता ओंकार सपकाळ व महादेव ओंकार सपकाळ या दोघे भावांनी जुन्या घटनेच्या निमित्ताने वादविवाद करून संतापाचे भरात प्रकाश घुये याला लाकडी दांडे व कुऱ्हाडीने घाव घालून भररस्त्यात ठार केले. सदर घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण आगे, पोलिस निरीक्षक सचिन इंगळे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून आरोपी दत्ता सपकाळ यास अटक केली. 

तसेच पंचनामा व इतर सोपस्कार करून ओमसाई फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेत मृतकाला शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. याप्रकरणी मृतकाची पत्नी शुभांगी योगेश घुये हिने नांदुरा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून कलम ३०२, ३४ भां द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक इंगळे व त्यांचे सहकारी रवींद्र हजारे, संजय राऊत, अजय ठाकूर, प्रवीण इतवारे, अमोल राऊत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Yerwala murdered in Jharlari on Thursday night