तरुण पिढीला हवाय बदल : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : गुजरातचे आदेश पाळायचे, त्यांच्या सोईचे निर्णय घ्यायचे, असा सपाटा राज्यशासनाने लावला आहे. यांचा परिणाम राज्यातील रोजगारावर झाला आहे. बेरोजगारी, महागाई, शेतीचे प्रश्‍न वाढत असल्याने तरुण वर्गात मोठा असंतोष दिसत असून तरुण पिढीला बदल हवा आहे, असेच चित्र सध्या राज्यात दिसत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

गुजरात गुंतवणूक करण्यात कसे सोईचे आहे, असे चित्र केंद्राकडून भासवले जात आहे. अहमदाबाद- मुंबई या बुलेट ट्रेनची मागणी कुणीही केली नसताना हा प्रकल्प हाती घेण्यात आला. यापेक्षा दिल्ली- मुंबई- नागपूर असा प्रकल्प हाती घेतला असता तर विदर्भ, मराठवाडा अशा राज्यांतील सर्वच भागाला त्याचा लाभ मिळाला असता, रोजगारनिर्मिती झाली असती. मात्र, सत्ताधाऱ्यांना तसे करायचे आहे असे दिसत नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या काळात सुरू झालेले कारखाने या सरकारच्या काळात बंद पडले आहेत. जे सुरू आहे, त्यातील कामगार काढले जात आहेत. राज्य आणि देशाला संकटात नेणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना खाली खेचू, असेही शरद पवार म्हणाले. यात आम्हाला युवकांची मोठी साथ मिळत असून युवकांचे प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरलेल्यांना तरुण पिढी जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही पवार म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young generation having change : Sharad Pawar