पुर्णा नदी स्वच्छतेसाठी युवा पिढीनी घेतला पुढाकार.

अतुल नवघरे
गुरुवार, 17 मे 2018

गावतील युवावर्गाने पूर्णा नदी स्वच्छ होत नाही तो पर्यंत ही स्वच्छता मोहीम सुरु ठेवण्याचे वचन घेतले. तिर्थ क्षेत्र श्री. लक्षेश्वर संस्थान मंदीरात बुधवारी सकाळी 7 वाजता नारळ फोडले व पूर्णा नदी स्वच्छतेचा शुंभारभ केला.

अकोला : मुर्तिजापुर तालुक्यातील तिर्थ क्षेत्र असलेल्या लाखपुरी येथे पूर्णा नदी आहे. पूर्णा नदी मध्ये अमरावती येथील अंबा नाल्याचे पाणी तसेच केमिकल्सयुक्त पाणी, आजुबाजुतील घाण पुर्णा नदी पात्रात आल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. संपुर्ण गावात खाज लागली आहे व पोटाचे विकार झाले आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे या गावाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे गावातील युवा वर्ग यांनी समोर येऊन पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला.

गावतील युवावर्गाने पूर्णा नदी स्वच्छ होत नाही तो पर्यंत ही स्वच्छता मोहीम सुरु ठेवण्याचे वचन घेतले. तिर्थ क्षेत्र श्री. लक्षेश्वर संस्थान मंदीरात बुधवारी सकाळी 7 वाजता नारळ फोडले व पूर्णा नदी स्वच्छतेचा शुंभारभ केला. आज पहिल्या दिवशी स्वच्छतेसाठी धर्मेंद्र चौहाण, मंगलसिंग चौहाण, निलेश ढाकरे, आशिष कोकाटे, अतुल नवघरे, अमोल व्यास, सुनिल राऊत, मंगेश धानोरकर, सौरभ देशमुख, अंबादास कुकडे, उपस्थित होते. उद्या(शुक्रवार) पूर्णा नदी स्वच्छता मोहीमेचा दुसरा दिवस आहे. सकाळी ७ ते ८.३० या दरम्यान श्रमदान केले जाईल. लाखपुरीकर, मुर्तिजापुरकर व अकोलाकर यांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान लाखपुरी येथील युवकांनी केले आहे.

Web Title: young generation took initiative to clean the river purna