कोरड्या विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

कोराडी ः विहिरीच्या काठावर बसलेल्या तरुणाचा तोल गेल्याने कोरड्या विहिरीत पडून मृत्यू झाला. विहिरीतून मोठ्याने आवाज आल्याने ही घटना उघडकीस आली. अग्निशमन जवानांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. प्रल्हाद अशोक रागीनवार (25, रा. आर्यनगर, कोराडी) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी, 1 ऑक्‍टोबरला दुपारच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद रागीनवार हा काहीच कामधंदा करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. वडील घरबांधकाम मिस्त्री आहेत. प्रल्हादचे लग्न झाले असून पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा आहे. दारूच्या त्रासामुळेच पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. मंगळवारी नेहमीप्रमाणे त्याने दारू ढोसली. घराच्या भिंतीशेजारीच एक विहीर आहे. 30 ते 35 फूट खोल असलेल्या विहिरीत मात्र, पाणी नाही. तो विहिरीच्या काठावर बसला. कदाचित तोल गेल्याने विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा. कारण विहीर कोरडी असली तरी तेथे विषारी वायू आहे. विहिरीत पडताच पत्नीने आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांकडून अग्निशमन जवानांना माहिती मिळाली. काही वेळातच अग्निशमन जवान घटनास्थळी पोहोचले. शिडीच्या मदतीने विहिरीत उतरत असताना विषारी वायू असल्याचे जाणवताच जवान परतला. विहिरीत विषारी वायूची खात्री करून घेण्यासाठी जवानाने जळती मेणबत्ती विहिरीत घातली असता काही दूर जाताच ती विझली. यावरून विषारी वायू असल्याची खात्री पटली. नंतर त्यांनी लोखंडी गळ टाकून त्याला विहिरीबाहेर काढले. पंचनामा करून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man dies in dry well