पेंचच्या कालव्यात युवकाचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

काचुरवाही (जि. नागपूर) : पेंच धरणातून भंडारा जिल्ह्यात जाणाऱ्या कालव्यात एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. कालव्यात पोहण्यासाठी आलेल्या युवकांना मृतदेह दिसल्याने तो त्यांनी बाहेर काढला व पोलिसांना माहिती दिली. 

पेंच धरणातील पाण्याचा विसर्ग कालव्यातून करण्यात येत असल्याने कालव्यात पाणी वाहते आहे. शुक्रवारी चिचाळा गावालगतच्या कालव्यात परिसरातील मुले व युवक कालव्यात पोहण्यास गेले असताना त्यांना मृतदेह दिसला. याची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली. तर काही युवकांनी कालव्यात उडी घेऊन मृतदेह कालव्याच्या किनाऱ्यापर्यंत आणला. पोलिस येईस्तोवर त्यास कालव्यातच ठेवण्यात आले. पोलिसांनी मृतदेहाला बाहेर काढले. मृताचे वय सुमारे 35-37 असावे, याशिवाय त्याच्या अंगावर केवळ अंडरवेअर असल्याने तो पोहण्यासाठी कालव्यात उतरला असावा व यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी रामटेक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man drowns in Punch's canal