

Fatal Electric Shock Claims Life of Daily Wage Worker in Manora
sakal
यवतमाळ: मानोरा तालुक्यातील पोहरादेवी-वसंतनगर रस्त्यावर शनिवारी (ता. २१) सायंकाळी २२ वर्षीय तरुण मजुराचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. झाडाची फांदी तोडत असताना जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने हा अपघात घडला. रोजंदारीवर काम करण्यासाठी आलेल्या तरुणाचा असा अचानक अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अजित गजानन तिवाळे (वय २२, रा. वेलतूर, गडचिरोली), असे मृताचे नाव आहे.