esakal | गुजरातमधून मजुरांना घेऊन येणारी खासगी बस त्याच्यासाठी ठरली कर्दनकाळ...वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गुजरात राज्यामधून मजुरांना घेऊन येणाऱ्या एका खासगी बसने सोमवारी (ता. 4) दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक युवक ठार झाला; तर त्याच्या मागे बसलेली अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोहमारा टी-पॉइंटजवळ घडला. एका लहानसा चुकीमुळे हा अपघात घडला.

गुजरातमधून मजुरांना घेऊन येणारी खासगी बस त्याच्यासाठी ठरली कर्दनकाळ...वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : खासगी बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला; तर मागे बसलेली मुलगी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोहमारा टी-पॉइंटजवळ घडली.

सुनील सूरजलाल उईके (वय 22, रा. खुर्शीपार), असे मृताचे नाव आहे. या अपघातात मेघा रूपचंद सयाम (वय 16, रा. सावरबंद/कुंभली) जखमी झाली. ही घटना सोमवारी (ता. 4) सकाळी सातच्या सुमारास पोलिस स्टेशन डुग्गीपारअंतर्गत घडली.

राष्ट्रीय महामार्गाने गुजरात राज्यातील सूरत येथून स्थलांतरित कामगारांना घेऊन खासगी बस (क्र. जीजे 21 व्ही 7725) ओडिसा येथे जात होती; तर सुनील उईके दुचाकीने (क्र. एमएच 35 क्‍यू 5650) सडक अर्जुनीवरून साकोलीकडे वेगाने जात होता. भरधाव वेगाने या युवकाचा जीव गेला.

जाणून घ्या : या गावाने केले संकटाचे संधीत रुपांतर, लॉकडाऊनमध्ये दिले दीड हजार मजुरांना काम

जखमीला मुलीला हलविले भंडाऱ्याच्या रुग्णालयात

दरम्यान, दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातात जखमी झालेल्या मुलीला प्रथम सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.