नंदनवनमध्ये युवकाचा खून

नंदनवनमध्ये युवकाचा खून

नागपूर ः नंदनवनमधील राजेंद्रनगर चौक, एसबीआय एटीएमजवळ दुचाकीवरील तीन आरोपींनी दहा रुपयांच्या अद्रकच्या (आले) पैशावरून एका युवकाचा चाकूने भोसकून खून केला. तर भाजीविक्रेत्याला गंभीर जखमी केले. हे हत्याकांड आज बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडले. मो. इम्रान मो. नियाज (वय 26, हसनबाग) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी मो. इम्रान हा राजेंद्रनगर चौकातील एका पानठेल्याजवळ उभा होता. त्याच्यापासून काही अंतरावर एक भाजीविक्रीचे दुकान लागले होते. संध्याकाळी 7.30 च्या सुमारास तीन तरुण दुचाकीने भाजीविक्रीच्या दुकानाजवळ आले. त्यांनी आले विकत घेतले व पैसे न देताच परत जात होते. दुकानदाराने पैशासाठी विचारणा केली असता ते दमदाटी करू लागले. यावेळी वाद होऊन त्यांनी दुकानदाराच्या पाठीत चाकूने वार केला. त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या इम्रानने मध्यस्थी करून आरोपींना हटकले. त्यानंतर भाजीविक्रेत्याला सोडून दिले व मोपेड घेऊन जायला लागले. काही अंतरावरून वळण घेऊन ते पुन्हा परतले व त्यांनी इम्रानवर अचानकपणे चाकूहल्ला केला. तो रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. आरोपी पळून गेले. इम्रानला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तिघांपैकी दोन आरोपींची नावे अतुल शेंडे आणि अक्षय असल्याची माहिती समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com