esakal | मुलीचे माझ्यासोबत लग्न लावा; अन्यथा पन्नास हजारांची खंडणी द्या!
sakal

बोलून बातमी शोधा

young men Demand money to girlfriend's uncle in Amravati

बदनामीपासून वाचायचे असेल तर पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी त्याने केली. त्याने घरी जाऊन युवतीशी छेडखानी केली होती. तिला ठार मारण्याची धमकी दिली होती. काही दिवसांपासून युवतीचा साकीब अली याने पाठलाग सुरू केल्याने ती त्याच्या त्रासाला कंटाळली होती. अखेर युवतीच्या पालकांच्या तक्रारीवरून नागपुरीगेट पोलिसांनी साकीब अलीविरुद्ध विनयभंग व खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल केला.

मुलीचे माझ्यासोबत लग्न लावा; अन्यथा पन्नास हजारांची खंडणी द्या!

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : जीवनात कधी काय घडेल, जीवनरुपी मार्गात कोण कोणाला आणि कधी भेटेल काही सांगता येत नाही. तसेच कोण कधी कशी मागणी घालेल हेही कोणी सांगू शकत नाही. असाच काहीसा प्रकार अमरावतीत घडला. ‘मुलीचे लग्न लावा; अन्यथा पन्नास हजारांची खंडणी द्या!' अशी मागणी युवकाने चक्‍क मुलीच्या काकाला केली. आता याची शहरभर चर्चा होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षीय युवती ही आपल्या काकांकडे नागपुरीगेट हद्दीत राहते. साकीब हा युवतीच्याच नात्यातील असल्यामुळे त्यांची आधीपासून ओळख होती. साकीबचा युवतीवर डोळा असल्यामुळे युवतीचे लग्न लावून न दिल्यास तिचे आपल्याजवळ असलेले काही आक्षेपार्ह फोटो व्हायरल करेल, अशी धमकी काकाला दिली.

जाणून घ्या - केसात कोंडा होतोय? आता घाबरू नका.. तुमच्या रोजच्या वापरातील या वस्तू ठरतील रामबाण उपाय...नक्की वाचा

बदनामीपासून वाचायचे असेल तर पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी त्याने केली. त्याने घरी जाऊन युवतीशी छेडखानी केली होती. तिला ठार मारण्याची धमकी दिली होती. काही दिवसांपासून युवतीचा साकीब अली याने पाठलाग सुरू केल्याने ती त्याच्या त्रासाला कंटाळली होती. अखेर युवतीच्या पालकांच्या तक्रारीवरून नागपुरीगेट पोलिसांनी साकीब अलीविरुद्ध विनयभंग व खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल केला.

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी

‘मुलीचे लग्न लावून द्या, अन्यथा असलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करतो', असे दोन पर्याय ठेवून पीडितेच्या काकाला युवकाने चक्क पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली. शहरातील नागपुरीगेट भागात ही घटना घडली. साकीब अली साहेब अली (वय २०, रा. गणोरी) असे खंडणी मागणाऱ्यचे नाव आहे.

संपादन - नीलेश डाखोरे 

loading image
go to top