प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने युवकाची आत्महत्या 

प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने युवकाची आत्महत्या 

नागपूर- प्रेयसीने लग्नास नकार देऊन दुसऱ्याच युवकाशी साखरपुडा केल्यामुळे नैराश्‍यातून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. युवतीवरील प्रेमाचा उल्लेख युवकाने सुसाईड नोटमध्ये केला आहे. पुष्पदीप रघुनाथ ब्राम्हणे (वय 26, रा. लोखंडे लेआउट, मानकापूर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

पुष्पदीप हा गेल्या दोन वर्षांपासून एका खेडेगावातून नागपुरात शिक्षणासाठी आलेल्या युवतीवर प्रेम करीत होता. दोघांनीही लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी युवतीच्या आईवडीलांना पुष्पदीपसोबत असलेल्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. त्यामुळे तिचे नातेवाईक असलेल्या युवकाशी लग्न जुळविले. तेव्हापासून युवती आणि पुष्पदीप हे दोघेही तणावात होते. दोघांनाही एकमेकांशिवाय जगणे कठिण होत होते. मात्र, आईवडीलाच्या हट्‌टापोटी युवतीने दुसऱ्या युवकासोबत सारखपुडा आटोपला होता. दोघेही फोनवरून संपर्कात होते. शेवटी युवतीने "मला विसरून जा..' असे सांगून लग्नास नकार दिला. त्यामुळे पुष्पदीप नैराश्‍यात गेला. त्याने शनिवारी दुपारी कुणीही घरी नसताना केबलने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

ताई...मी आत्महत्या करतोय ! 
शनिवारी दुपारी भाऊ बादल हा बाहेर गेला होता तर आईवडील दवाखान्यात गेले होते. प्रचंड तणावात असलेल्या पुष्पदीपने अजनीत राहणारी मावसबहिण मयुरी पाटील हिला फोन केला. "ताई..मला तिच्याशिवाय नाही जगायचं...म्हणून मी आत्महत्या करतोय.' असे म्हणाला. बहिणीने त्याची समजूत घातली. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी तिने भाऊ बादलला फोन केला आणि ताबडतोब घरी पोहचण्यास सांगितले.

दोन पानांची सुसाईड नोट 
पुष्पदीपने इंग्रजीमध्ये दोन पानाची सुसाईट नोट लिहिली. त्यामध्ये प्रेयसीशी लग्न करू शकत नसल्याचे दुःख मांडून ठेवले. तसेच तिच्याशिवाय जगू शकत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले. उच्चशिक्षित असलेल्या पुष्पदीपने असा टोकाचा निर्णय घेतल्याने आईवडीलांना धक्‍का बसला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com