युवक काँग्रेसचे आज ठरणार शिलेदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

युवक काँग्रेसच्या जिल्हा स्तरावरील विविध पदांसाठी रविवारपासून मतदान घेण्यात आले. मतदानाचा आज (ता.12) बुधवार शेवटचा दिवस असून, सायंकाळी सर्व शिलेदारांची घोषणा होणार आहे.

अकोला- युवक काँग्रेसच्या जिल्हा स्तरावरील विविध पदांसाठी रविवारपासून मतदान घेण्यात आले. मतदानाचा आज (ता.12) बुधवार शेवटचा दिवस असून, सायंकाळी सर्व शिलेदारांची घोषणा होणार आहे.

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष पदासाठी राज्यभरात 9 ते 11 सप्टेंबर रोजी टॅबमधील एका अ‍ॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदासाठी महेश गणगणे, निनाद मानकर, तर शहराध्यक्ष पदासाठी अंशुमन देशमुख, आकाश शिरसाट, सुमती गवई रिंगणात आहेत. त्यांच्यासह जिल्हा महासचिव पदासाठी अभिलाष तायडे, फारुख पटेल आदींच्या भाग्याचा फैसला उद्या होणार आहे.

अकोला पश्‍चिमसाठी आज मतदान
अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघासाठी युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष निवडण्याकरिता बुधवारी सकाळी मतदान होणार आहे. यापदासाठी शारिक आणि फैजल हे दोन उमेदवार रिंगणात आहेत.

असे झाले मतदान
बाळापूर ः 50 टक्के
अकोला पूर्व व मूर्जिजापूर ः 35 टक्के
अकोट ः 53  टक्के

प्रदेशाध्यक्षपदासाठीही चुरस
राज्यभर युवक काँग्रेस सदस्यांची नोंदणी करण्यात आली. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सदस्य नोंदणीसाठी मोहीम राबविण्यात आली होती. यात तब्बल 30 हजारांवर युवक काँग्रेसच्या सदस्यांची नोंदणी झाली. ते आता युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडणार आहेत. या पदासाठी चुरस असून, आमदार अमित झनक, सत्यजित तांबे व कुणाल राऊत यांच्यात थेट लढत होत आहे. प्रदेश महासचिव पदासाठी सागर देवेंद्र कावरे, अभिषेक भरगड, सागर देशमुख व श्रेयश इंगोले रिंगणात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Congress voting result today