esakal | अपघाताची माहिती देण्यासाठी त्याने घरच्यांना केला फोन; मात्र आवाज काही येत नव्हता
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

अपघाताची माहिती देण्यासाठी त्याने घरच्यांना केला फोन; मात्र

sakal_logo
By
संदीप रायपुरे.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : तो आमदाराच्या वाढदिवसानिमित्त घराबाहेर पडला. कामानिमित्त दुचाकीने दुसऱ्या ठिकाणी जात होता. मात्र, वाटेत त्याचा अपघात झाला. त्याने लगेच घरच्यांना फोन करून आपला अपघात झाल्याची माहिती दिली. काही वेळांनी फोन सुरू होता; मात्र आवाज बंद झाला होता. कारण, काळाने त्याच्यावर घाला घातला होता. ही घटना रविवारी रात्री गोंडपिपरी मार्गावरील आक्सापूरच्या हनुमान मंदिरालगतच्या वळनावर घडली. विस्तारी इटकलवार (वय ४०, रा. पंचशील वॉर्ड, गोंडपिपरी) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज आमदार सुभाष धोटे यांचा वाढदिवस होता. दुपारी तीन वाजता ते गोंडपिपरी येथे येणार होते. त्यांच्याकडे मादगी समाजभवनासाठी जागेची मागणी करण्यासंदर्भात तो निवेदन देण्याच्या तयारीत होता. मात्र, अचानक आमदारांचा दौरा रद्द झाला. यामुळे विस्तारी पुढील कामाला लागला. काही कामासाठी तो कोठारी मार्गाने गेला होता.

काम निपटवून परत येत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूरच्या हनुमान मंदिरा लगतच्या वळनावर त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघात होताच त्याने भ्रमणध्वनीवरून घरच्यांना आपला अपघात झाल्याची माहिती दिली. बोलताना अचानक आवाज येने बंद झाले. भ्रमणध्वनी सुरू होता; मात्र, घरच्यांना काहीच आवाज येत नव्हता. कारण, त्याचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा: अधिवेशन नागपूरला होणार? विधिमंडळ सचिव १८ ला घेणार आढावा

काही वेळातच नातेवाइक व मित्रमंडळी घटनास्थळावर दाखल झाले आणि त्याला उपचारासाठी गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. समाजासाठी धडपडणाऱ्या चाळीस वर्षीय युवकाच्या अपघाती मृत्यूने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. विस्तारी बसस्थानकावर चने व फुटाणे विकण्याचे काम करीत होता. तसेच तो मादगी समाज संघटनेचा तालुकाध्यक्ष होता.

loading image
go to top