शेततळ्यात बुडून युवकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

उमरेड (जि.नागपूर)  : तालुक्‍यातील मौजा विरली शिवारातील शेतात शेततळ्याची पाहणी करण्याकरिता गेलेल्या 38 वर्षीय तरुणाचा पाय घसरून शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. भूषण रामचंद्र चौधरी (रा. रेशीमबाग, नागपूर) असे मृताचे नाव आहे. भूषणची यांची शेती ती घटनास्थळ मौजा विरली शिवारात असून ते शेताची पाहणी करण्याकरिता गेले होते. शेतातील शेततळ्यात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची तोंडी रिपोर्ट विजय मारोतराव जामनगर यांनी उमरेड पोलिसांना दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth dies after drowning in field