चारा आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा अपघातात मृत्यू; नागरिकांची आर्थिक मदतीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Youth dies in tractor accident

अपघातानंतर ट्रॅक्टर पलटी झाला. चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती होताच नातलग आणि ग्रामस्थानी आरोपीला तत्काळ अटक करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

चारा आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा अपघातात मृत्यू; नागरिकांची आर्थिक मदतीची मागणी

राजुरा (जि. चंद्रपूर) : ट्रॅक्टर अपघातात १७ वर्षीय उमेश पुडलीक सोनूरले याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १२) सकाळी विहीरगाव येथे घडली. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी उमेश सोनूरले हा बकरीला चारा आणण्यासाठी सायकलने मूर्तीकडे जाणाऱ्या मार्गाने जात होता. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने वाहन निष्काळजीपनाणे चालवून सायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत उमेशचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या वाळू भरून आणली जात होती.

अपघातानंतर ट्रॅक्टर पलटी झाला. चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती होताच नातलग आणि ग्रामस्थानी आरोपीला तत्काळ अटक करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. विरूर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, तोडगा काढणे सुरू आहे.

क्लिक करा - सरकार फक्त तीन टक्केच शेतकऱ्यांना देणार मदत!; कारण वाचून बसेल धक्का

उमेश हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अत्यंत हुशार विद्यार्थी होता. त्याचे अक्षर अतिशय सुंदर होते. विहीरगाव हे अवैध वाळू तस्करीचे केंद्र बनले आहे. राजरोसपणे या परिसरातील नाल्यातून अवैधरित्या वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. मागील महिन्यात सातरी गावाजवळ ट्रॅक्टर अपघातात एकाचा मृत्यू झाला होता, हे विशेष...

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top