युवकांचा आधुनिक शेतीकडे कल; नवनवीन प्रयोगातून उत्पादनात वाढ; महिन्याला 20 ते 25 हजारांचा नफा

किशोर वालदे 
Friday, 30 October 2020

आजच्या युगात शेती ही आधुनिक पद्धतीने करणे हाच एक उत्तम पर्याय आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती शक्‍य होणार नाही, असेच विचार आता ग्रामीण क्षेत्रातील युवक व शेतकऱ्यांत दिसत आहेत

साखरीटोला (जि. गोंदिया) ः उच्चशिक्षित युवकांचा आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे कल वाढला असून, कडोतीटोला येथील एका युवकाने शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादनात वाढ केली आहे. यातून त्यांना महिन्याकाठी 20 ते 25 हजार रुपये नफा होत आहे.

हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

आजच्या युगात शेती ही आधुनिक पद्धतीने करणे हाच एक उत्तम पर्याय आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती शक्‍य होणार नाही, असेच विचार आता ग्रामीण क्षेत्रातील युवक व शेतकऱ्यांत दिसत आहेत. त्यामुळेच आधुनिक शेतीचे ते धडे घेत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून त्याच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करीत आहेत.

कडोतीटोला येथील उच्चशिक्षित नरेश बहेकार हे नोकरीची वाट न पाहता आपल्या वडिलांसोबत आधुनिक शेती करीत असून, एक ते दोन वर्षांपासून एक एकरामध्ये भाजीपाल्याची लागवड करीत आहेत. बटाटे, वांगी, मिरची, टमाटर, अद्रक, कोबी ,भेंडी आदी पिके घेऊन चिल्लर व ठोक भावात ते विकत असतात. यातून महिन्याला 20 ते 25 हजार रुपये नफा मिळत आहे. त्यांना कृषी सल्लागार देवराम चुटे व कृषी सेवक नागदेवे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.

महत्वाची बातमी - शेतकऱ्यांनो, हिरव्या संत्र्याला गळती आली? घाबरू नका! कृषी विभागाने पुढील उपाय करण्याचा दिला सल्ला

आजच्या युगात प्रत्येकाला नोकरी मिळणे अशक्‍य आहे. त्यामुळे मी निश्‍चय केला की धानपिकांबरोबर भाजीपाला लागवड करून चांगले उत्पन्न मिळवता येतो. मी आधुनिक पद्धतीने धानपिकांसह भाजीपाल्यांची लागवड करतो. यामुळे मला महिन्याला चांगला नफा मिळत आहे.
नरेश बहेकार, युवक शेतकरी, कडोतीटोला.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth doing good farming and earning good money