अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

त्याला व मित्रांना अंघोळीचा मोह आवरला नाही. तो अंघोळ करीत असताना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून घटनेची माहिती पोलिसांना दिली

गोंदिया - मित्रांसोबत अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.11) सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. अमन श्‍याम चिचखेडे (वय 19 ) असे मृताचे नाव आहे.

गोंदियाच्या सूर्याटोला येथील अमन चिचखेडे हा लाखांदूर येथे बी.एस्सी. करीत होता. सुट्या असल्याने तो गोंदियाला आला होता. गुरुवारी मित्रांसोबत फिरायला धापेवाडा उपसा सिंचन योजना परिसरात गेला. त्याला व मित्रांना अंघोळीचा मोह आवरला नाही. तो अंघोळ करीत असताना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची नोंद केली. केटीएस रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.

Web Title: youth drowned in gondia