"ते' युवक पावसाळी पर्यटनाला गेले होते, मात्र काळाने साधली संधी... 

संतोष तापकिरे
Friday, 24 July 2020

गुरुवारी (ता. 23) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील सहा युवक दुचाकीने धारखोरा येथे पोहोचले. हे ठिकाण परतवाड्यापासून वीस किलोमीटर अंतरावर धारणी मार्गावर असून ते मध्य प्रदेशात येते. नमूद तिघांना डोहात पोहोण्याचा मोह आवरला नाही. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्यामुळे ते खोल पाण्यात बुडाले व त्यांचा मृत्यू झाला.

अमरावती  : पावसाळ्यात पर्यटनासाठी अमरावती येथून मध्य प्रदेशच्या धारखोरा येथे गेलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला. मृत युवक हे बडनेरा आणि शहरातील मसानगंज परिसरातील रहिवासी आहेत. आशीष कोटेजा, दीपक मिश्रा व विनय कुशवाह अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे असल्याचे महापालिकेचे माजी बांधकाम समिती सभापती अजय सारस्कर यांनी सांगितले. 

गुरुवारी (ता. 23) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील सहा युवक दुचाकीने धारखोरा येथे पोहोचले. हे ठिकाण परतवाड्यापासून वीस किलोमीटर अंतरावर धारणी मार्गावर असून ते मध्य प्रदेशात येते. नमूद तिघांना डोहात पोहोण्याचा मोह आवरला नाही. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्यामुळे ते खोल पाण्यात बुडाले व त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळ परतवाड्यापासून कमी अंतरावर असल्याने परतवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. वृत्त लिहिस्तोवर मध्य प्रदेशातील भैसदेही पोलिस घटनास्थळी पोहोचायचे होते. काही लोकांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. आशीष, दीपक आणि विनय यांचे मृतदेह घेण्यासाठी अमरावती येथून त्यांचे नातेवाईक धारखोरा येथे रवाना झाल्याचे सारस्कर यांनी सांगितले. परतवाडा किंवा मध्य प्रदेशातील भैसदेही पोलिसांकडून मृत युवकांच्या नावांची पुष्टी होऊ शकली नाही. 

अवश्य वाचा- तुम्ही तिला माहेरून आणण्यासाठी पुढाकार का घेत नाही, असे म्हणताच तो चवताळला.....

भैसदेही पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बसंत आहाके यांच्याशी संपर्क साधला असता घटनास्थळी पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. आज तीन युवकांनी पोलिस ठाण्याला येऊन माहिती दिली की आम्ही सहा व्यक्ती धारखोरा येथे फिरण्यास गेलो असता त्यातील तीनजण बुडाले. त्यात दीपक विनोद मिश्रा, (वय 18, रा. गोपालनगर), आशीष कोटेजा (वय 19, रा. नवीवस्ती बडनेरा) व विनय लक्ष्मीनारायण कुशवाह (वय 18, रा. मसानगंज) हे डोहामध्ये बुडाले. माहिती मिळताच ठाणेदार सदानंद मानकर यांच्यासह सहायक पोलिस उपनिरीक्षक सतीश पुनसे, शेख नाझिम, सुशांत महल्ले, मंगेश फुकट, शफीक शेख, सतीश रिठे, सईद भोपाली हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पाण्यात बुडालेल्या तिन्ही युवकांना बाहेर काढून मोठ्या कसरतीने वाहतुकीच्या रस्त्यापर्यंत आणून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले, असे परतवाडा पोलिसांनी सांगितले. 

संपादन - राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "The youth had gone on a rainy season tour and died in the waterfall