खड्ड्यांमुळे जखमी युवकाची महापौरांविरुद्ध पोलिसात धाव

file phote
file phote

नागपूर ः महापालिकेसह शहरात रस्ते असलेल्या विविध संस्थांनी खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला असला तरी अनेक भागांत दुचाकीधारकांत खड्ड्यांची दहशत कायम आहे. फ्रेण्डस कॉलनी येथील एका खड्ड्यातून वाहन उसळल्याने जखमी झालेल्या तरुणाने चक्क महापौर नंदा जिचकार, फ्रेण्डस कॉलनीतील नगरसेवक, महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला. लक्ष्मीनगरातील रहिवासी राजीव रंजन सिंग दुचाकीने रविवारी सायंकाळी फ्रेण्ड्‌स कॉलनीतील मित्राकडे जात होते. आकारनगर ते फ्रेण्ड्‌स कॉलनी रस्त्यावरील खड्ड्यांना बगल देताना ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. हेल्मेट घातल्यामुळे डोके बचावले, मात्र त्यांच्या डाव्या पायाला चांगलीच दुखापत झाली. या रस्त्यावर अनेक खड्डे असून रात्री नऊच्या सुमारास फ्रेण्ड्‌स कॉलनी घाटाजवळ पडल्याचे राजीव रंजन सिंग यांनी नमूद केले. आमदार सुधाकर देशमुख यांच्या घरापासून 100 मीटर अंतरावर हे खड्डे आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. या घटनेसाठी महापौर नंदा जिचकार, फ्रेण्डस कॉलनीतील नगरसेवक, आमदार सुधाकर देशमुख जबाबदार असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठून महापौर नंदा जिचकार, आमदार, नगरसेवक व मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. गिट्टीखदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय अढाऊ यांनीही तक्रार आल्याचे नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com