हाजरा फॉलमध्ये युवक बुडाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

सालेकसा (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील हाजरा फॉल येथे तीन मित्रांसोबत वाढदिवस साजरा करायला गेलेला गोंदियाच्या मरारटोली येथील हेमंत लाटे (वय 18) हा युवक रविवारी (ता.21) सायंकाळी हाजरा फॉल धबधब्यात बुडाला. या घटनेची माहिती लगेच सालेकसा पोलीस ठाण्याला व गोंदिया पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. युवकाचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने रविवारी रात्री शोधकार्य केल्यानंतरही तो आढळला नाही. त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. आज, सोमवारी पुन्हा सकाळी शोधकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजन चौबे यांनी दिली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The youth lost in Hazara Fall