अकोला: पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून

अनिल दंदी 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पार्टी झाल्यावर केला घात
काल बुधवारी गावातीलच काही तरूणांनी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये आरोपी व शुभम देखील सहभागी झाले होते. आज दिवसभऱ्याच्या कुणीकुणी नंतर सायंकाळी एका दारूच्या गुत्त्यावर दोघेही एकत्र आले. आरोपी अहमद खानने चाकूचा पहीला वार दारूच्या गुत्त्यावर केला. त्यानंतर शुभम बाहेर आला. त्या पाठोपाठ आरोपी देखील आला. बाचाबाची वाढत गेली व आरोपीने शुभमवर चाकूने पाच वार केले. यातच त्याचा मृत्यू झाला.

अकोला : पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा खून झाल्याची घटना बाळपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोरेगाव खुर्द येथे काल बुधवारी सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, ठाणेदार विनोद ठाकरे, सहा. पोलिस निरीक्षक वैभव पाटील व त्यांचा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. 

शुभम बाळू दुतोंडे (२२) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी अहमद खान गुड्डू पठाण उर्फ पप्पू या ३० वर्षीय युवकाला बाळापूर पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे गोरेगाव व परीसरात खळबळ उडाली आहे. गोरेगावातील एका दारूच्या गुत्त्यावर दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. आरोपी अहमद खानने शुभम च्या मानेवर, छातीत व पोटावर धारदार चाकूचे पाच वार केले. त्यामुळे शुभम रक्ताच्या थारोळ्यात पडला. 

बाळापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस पथक गोरेगावात पोहोचले. पोलिसांनी विचारपूस केली. आरोपीचे वर्णन घेऊन  पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. व आरोपीला तात्काळ अटक केली. शुभम हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. मनमिळाऊ स्वभावाचा शुभम हा गावातील एका ट्रॅक्टरवर चालक होता. त्यानंतर त्याने ट्रॅक्टर सोडून काळी पिवळी टॅक्सीवर तो काम करत होता. तर आरोपीचे कुटुंब हे वाशीम जिल्ह्य़ातील रिसोड तालुक्यातील असून ते दहा वर्षा पासून गोरेगावात वास्तव्यास आहेत. आरोपी अहमद खान शुभमचे अनेकदा भांडण झाले होते. त्यातून आरोपीने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

पार्टी झाल्यावर केला घात
काल बुधवारी गावातीलच काही तरूणांनी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये आरोपी व शुभम देखील सहभागी झाले होते. आज दिवसभऱ्याच्या कुणीकुणी नंतर सायंकाळी एका दारूच्या गुत्त्यावर दोघेही एकत्र आले. आरोपी अहमद खानने चाकूचा पहीला वार दारूच्या गुत्त्यावर केला. त्यानंतर शुभम बाहेर आला. त्या पाठोपाठ आरोपी देखील आला. बाचाबाची वाढत गेली व आरोपीने शुभमवर चाकूने पाच वार केले. यातच त्याचा मृत्यू झाला.

Web Title: youth murder in Akola