पैशाच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नागपूर - उधारीच्या पैशावरून झालेल्या भांडणात मित्रानेच सिमेंटच्या बाकावर झोपलेला अमोल गिरीधारी भेंडारकर (२८, रा. दुबेनगर) या तरुणाच्या डोक्‍यात दगडाने वार करून निर्घृण खून केला. ही घटना शनिवारी रात्री हुडकेश्‍वर मार्गावरील नागरे सभागृहामागे घडली. मागील १४ दिवसांतील हे नववे हत्याकांड आहे.

आरोपी लवंग उर्फ संदेश सुभाष पाटील (३०) आणि अमोल हे एकाच वस्तीत राहतात. अमोलचे घरीच कपडे इस्त्रीचे दुकान आहे. लवंग काहीच कामधंदा करीत नव्हता. तीन-चार महिन्यांपूर्वी लवंगने अमोलला ५० हजार रुपये उधार दिले होते. लवंगने पैसे परत मागितले. परंतु, पैसे देण्यासाठी अमोल टाळाटाळ करीत होता. त्यावरून त्यांच्यात नेहमीच वाद होत असे.

अमोलला दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो नागरे सभागृहामागे असलेल्या शिव मंदिरातील सिमेंटच्या बाकड्यावर झोपत होता. पैशाच्या वादावरून शनिवारी रात्रीही त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर अमोल शिव मंदिराकडे झोपायला गेला. रात्री दोन वाजताच्या सुमारास लवंग हा घटनास्थळी गेला आणि झोपेत असलेल्या अमोलच्या डोक्‍यावर दगडाने मारून खून केला. बराच वेळ झाला, तरी अमोल घरी न आल्याने कुटुंबीय त्याला शोधत होते. ते शिव मंदिराकडे गेले असता अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मेडिकलमध्ये नेले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती हुडकेश्‍वर पोलिसांना समजताच दुय्यम पोलिस निरीक्षक किशोर चौधरी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी लवंग उर्फ संदेश यास अटक केली.

Web Title: youth murder crime