Wild Boars Attack News : रानडुकराच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

धानोरा तालुक्यातील मुरूमगाववरून १० किमी अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशील विभागातील केहकावाही मसाद या गावातील एका युवकावर रानडुकराने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला.
Wild Boars Attack News
Wild Boars Attack Newssakal

धानोरा (जि गडचिरोली) : धानोरा तालुक्यातील मुरूमगाववरून १० किमी अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशील विभागातील केहकावाही मसाद या गावातील एका युवकावर रानडुकराने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. हिरामण सावजी वड्डे (वय ३६) असे जखमीचे नाव असून ही घटना मंगळवार (ता. ९) दुपारी ४ वाजता घडली.

Wild Boars Attack News
Nagpur Accident News : रायपूर-नागपूरला जाणारी खासगी ट्रॅव्हल्स उलटली; तीन जखमी

हिरामण वड्डे जंगलात चारोळी वेचत असताना एका रानडुकराने अचानक त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला डोक्यात, मांडीवर, चेहऱ्यावर. पाठीवर गंभीर स्वरूपात जखमा झाल्या आहेत. त्याला त्वरित मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यास आले. प्राथमिक उपचार वैद्यकीय अधिकारी डाॅ. उमेश धुर्वे व सहयोगी कर्मचारी संगीता चुधरी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com