प्रियकराने दिला दगा, प्रेयसीची आत्महत्या

file photo
file photo

नागपूर : फेसबूकवरून फुललेल्या प्रेमसंबंधानंतर प्रियकर अज्जू ऊर्फ अजत (रा. राजकोट, राजस्थान) याने लग्नाचे आमिष दाखवले. दोन वर्षे संबंध ठेवून शोषण केले. मात्र, दुसऱ्याच तरुणीशी लग्न करून प्रेयसी रेखा उईके (38, रा. इंद्रप्रस्थनगर) हिला घराबाहेर काढले. मानसिकरीत्या खचलेल्या प्रेयसीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोनेगाव परिसरात उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये रेखाची अज्जूशी फेसबूकवरून ओळख झाली. सुरवातीला चॅटिंग आणि नंतर मोबाईल नंबर देऊन फोन सुरू झाले. दोघांत मैत्रीनंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. तो रेखाच्या भेटीसाठी नागपुरात आला तर अनेकदा रेखाही त्याच्या घरी जाऊन आली. दोन वर्षांपासून ते पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. कधी रेखा त्याच्याकडे राजकोटला जाऊन राहायची तर कधी तो नागपुरात येऊन तिच्याकडे राहायचा.
जुलैमध्ये ती राजकोटला गेली असता अज्जूने दुसऱ्या युवतीशी विवाह केला होता. तिने चौकशी केली असता अज्जूने आयुष्यातून निघून जाण्यास सांगितले. मनाने खचलेली रेखा नागपुरात परतली. तेव्हापासून ती तणावात होती. काही दिवसांनी तिने गळफास लावून आत्महत्या केली. सोनेगाव पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर चौकशी करून आई यशोदाबाई जालुराम उईके (60) यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com