गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

राजेश सोळंकी
गुरुवार, 12 जुलै 2018

आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून, पोलिस तपास सुरु आहे. गुरुवार बाजाराचा दिवस असल्याने या गोडाऊन समोर मोठी गर्दी झाली होती.

आर्वी : येथील भरबाजारातील लकडगंज परिसरातील स्वतःच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (ता. १२) दुपारी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.

विशाल कैलास मोटवानी वय (२३) असे मृतक युवकाचे नाव आहे. येथील व्यापारी स्वरस्वती इलेक्ट्रॉनिकचे मालक कैलास मोटवाणी याचा तो मुलगा असून सावकार प्रतापसेठ मोटवानी याचा नातू होता. विशाल बुधवार(ता ११) सायंकाळीपासून बेपत्ता होता. त्यामुळे त्याचा शोध सुरू होता. येथील लकडगंज परिसरात असलेल्या गोडाऊनमध्ये विशालने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याच गोडाऊनमध्ये काही वर्षांपूर्वी याच कुटुंबातील एका महिलेने आत्महत्या केली होती, अशी चर्चा सुरु होती.

आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून, पोलिस तपास सुरु आहे. गुरुवार बाजाराचा दिवस असल्याने या गोडाऊन समोर मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Youth suicide by hanging