यवतमाळातील तरुण उतरले बेंबळा धरणाच्या पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

आंदोलनातून प्रशासनाला पाण्याच्या तीव्रतेची जाणीव करून देणाचा प्रयत्न केला. परंतु गेंडयाची कातडी पांघरलेल्या या शासनाला या पाणी समस्यांची जाणीव केव्हा होणार असा सवाल या वेळी निखिल गायकवाड यांनी केला.

यवतमाळ - यावतमाळकर जनता पिण्याच्या पाण्यासाठी होरपळत असताना पाण्यासाठी केवळ आश्वासनांचा बाजार मांडण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदविण्यासाठी यवतमाळातील युवक थेट बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या पात्रात उतरून भर उन्हात अर्धनग्न आंदोलन केले. 

या आंदोलनातून प्रशासनाला पाण्याच्या तीव्रतेची जाणीव करून देणाचा प्रयत्न केला. परंतु गेंडयाची कातडी पांघरलेल्या या शासनाला या पाणी समस्यांची जाणीव केव्हा होणार असा सवाल या वेळी निखिल गायकवाड यांनी केला. ते पुढे मागणी करीत म्हणाले की, आजच्या स्थितीत यवतमाळकर जनतेला वाय फायऐवजी वाढीव टँकर देण्याची मागणी केली व जूनपर्यंत पाणी न दिल्यास हजारो यवतमाळकर नागरिक या बेंबळाच्या बुडीत क्षेत्रातील पाण्यात बसविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला दारूचा यवतमाळ पॅटर्नची आठवण करीत 'दारू दिली चकना दिला, पाणी द्या, पाणी द्या' अश्या घोषणांनी प्रशासनापुढे आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी निखिल गायकवाड, नितीन जुनघरे, आशुतोष धोटे, सुमित गावंडे, आनंद बुटले, मनीष राऊत, तुषार फुकट, सौरभ गोडे, गौरव इंगळे, सुमित बिडकर, शिवा सवाईमुल, कनोजे, अभिजित सोळंखे, आशुतोष धोटे, त्रिमुख आडे, अथर्व नागरमोते, धीरज खारकर, वृषिकेश मोटे आदी युवक सहभागी झाले होते यांच्या या आंदोलनाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी सभापती अरुण राऊत, अनिल गायकवाड यांनी भेटी देऊन आपले समर्थन दिले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The youth of Yavatmal organized the agitation against dam issue