... म्हणून स्टेचरवरून नेले मतदानासाठी, हे होते कारण?

gadchiroli news
gadchiroli news

गडचिरोली : भरधाव कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात भाजपचे चार जिल्हा परिषद सदस्य गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता.16) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्‍यातील जांभूळखेडा गावाजवळ घडली होती. या घटनेमुळे सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का बसेल की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच मतदानासाठी जखमींना चक्क स्टेचरवरून जिल्हा परिषदेच्या सभागृहात नेण्यात आले. यामुळे भाजपला सभापतिपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त करता आला.

गडचिरोली जिल्हा परिषदेत विविध सभापतींची निवडणूक गुरुवारी (ता.16) दुपारी पार पडली. या निवडणुकीसाठी कॉंग्रेस, भाजप, राकॉं व आदिवासी विद्यार्थी संघाने व्यूहरचना आखली होती. यासाठी सर्वच सदस्यांना आठवड्याभरापासून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. गुरुवारी (ता. 15) सकाळी भाजपचे चार जिल्हा परिषद सदस्य देवरी येथून गडचिरोली येथे मतदानासाठी परत येत असताना जांभूळखेडा गावालगत त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली.

यात कुरखेडा -कढोली जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य भाग्यवान टेकाम, वैरागड, मानापूर येथील जिल्हा परिषद सदस्य संपत्ती आडे, विहीरगाव-किन्हाळा जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी आणि गडचिरोली-चामोर्शी तालुक्‍यातील जिल्हा परिषद सदस्य सोनटक्‍के गंभीर जखमी झाले होते. त्यांना लागलीच गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

मतदानानंतर परत रुग्णालयात
दुपारी सभापतिपदाची निवडणूक असताना घडलेल्या घटनेमुळे भाजपमध्ये चिंतेचे वातावरण होते. जखमी सदस्य सभागृहात पोहोचेल की नाही, असा संभ्रम निर्माण झाला. मात्र, सभापतिपदे आपल्या पदरात पाडण्यासाठी संख्याबळाची गरज असल्याने अखेर जखमी सदस्यांना रुग्णालयातून चक्क स्ट्रेचरवरून सभागृहात आणण्यात आले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर परत रुग्णालयात पोहोचवण्यात आले.

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का देत कॉंग्रेस- आविसने बाजी मारली होती. त्यानंतर सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू असतानाच अपघाताच्या घटनेमुळे भाजप नेत्यांपुढे संकट निर्माण झाले होते. मात्र, अखेर जखमी सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याने भाजपला सभापतिपदाच्या निवडणुकीत विजय प्राप्त करता आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com