जिल्हा परिषद शाळेतील "डिजिटल' शिक्षण अंधारात

टेकाडी ः कोयला खदान येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत.
टेकाडी ः कोयला खदान येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत.

टेकाडी  (जि.नागपूर) : येथील जिल्हा परिषद शाळेचा दोन महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. डिजिटल इंडियाअंतर्गत शाळेला प्रोजेक्‍टर उपलब्ध करून दिल्या गेले, परंतु संगणक उपलब्ध नसल्याने प्रोजेक्‍टर धूळखात आहे. शाळेला इंटरनेट पुरविणारी यंत्रणादेखील निकामी पडली असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण सध्या मिळत नसल्याने डिजिटल शिक्षण अंधारात असल्याचे चित्र आहे. 
जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक काळातील शिक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी डिजिटल शाळांची संकल्पना राज्य शासनाने सर्वच स्तरावर अमलात आणली. त्याच धर्तीवर वर्ग पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या टेकाडी येथील जिल्हा परिषद शाळेला 25 एप्रिलला प्रोजेक्‍टर उपलब्ध करून देण्यात आले. परंतु, डिजिटल शिक्षणासाठी संगणकाचीही गरज पडते. कदाचित शिक्षण विभागाला याचा विसर पडला असावा. कारण शाळेत अद्याप संगणक उपलब्ध करून देण्यात आलेले नसून कदाचित पुढल्या वर्षी संगणक येणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. अशात यावर्षी चौथ्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाच काय, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अत्यंत कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डिजिटल शिक्षणाची यंत्रणा ढासळत असून शाळेचा दोन महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित करून ठेवल्याने जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याच्या कार्यात सहकार्य करणाऱ्या शिक्षकांना डिजिटल शाळा चालवणे अवघड होऊन बसणार आहे. त्यामुळे "संगणक, इंटरनेट आणि वीजबिलाची व्यवस्था राज्य शासनाने करावी, मगच डिजिटल शिक्षणाची स्वप्नपूर्ती होणार असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
कनेक्‍टिव्हीटी नाही 
शाळेला लागून असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयातदेखील डिजिटल भारताची आधुनिक प्रणाली शासनाकडून धूळखात आहे. ग्रामपंचायत कार्यालयात इंटरनेटसाठी "वायफाय' यंत्रणा तर लावली आहे, परंतु कधी "कनेक्‍ट' झाली नसल्याने कुचकामी ठरली आहे. सध्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमधील नेटवर्कने ग्रामपंचायतीच्या ऑनलाइन कारभाराला जिवंत ठेवलेले आहे. शासनाकडून कुठलाही इंटरनेटचा इतरत्र खर्च न घेता. अशात गावच्या ग्रामपंचायतीलाच कनेक्‍टिव्हिटीचा खोडा आहे. मग नजीकच्या डिजिटल शाळेचे काय, असा सवाल स्थानिक करत आहेत.
 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com